दूरसंचार कंपन्यांत पेटले दर युद्धस्वस्त होणार इंटरनेट?नवी दिल्ली : रिलायन्स जिओने स्वस्त फोर-जी सेवा सुरू केल्यामुळे दूरसंचार कंपन्य...
दूरसंचार कंपन्यांत पेटले दर युद्धस्वस्त होणार इंटरनेट?नवी दिल्ली : रिलायन्स जिओने स्वस्त फोर-जी सेवा सुरू केल्यामुळे दूरसंचार कंपन्यांमध्ये डेटा स्वस्त करण्याचे दर युद्ध पेटले आहे. एअरटेल आणि आयडिया कंपन्यांनी आपल्या दरात कपात करतानाच ६७ टक्के जादा डेटा देण्याचा प्रस्ताव ग्राहकांना दिला आहे. त्यामुळे आगामी काळात इतर कंपन्या देखील या दर युद्धात उड्या घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मोबाइल ब्रॉडबँड ग्राहकांना मात्र लाभ होत आहे. रिलयान्स जिओ इन्फोकॉम येत्या १५ दिवसांत आपली फोर-जी सेवा सुरू करणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना खूपच कमी दरात डेटा पॅक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दुसर्या कंपन्या आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी दबावाखाली आल्या आहेत. परिणामी, त्यांच्यात दर युद्ध भडकले आहे. एअरटेल आणि आयडिया यांनी ६७ टक्के जादा डेटा देण्याचा प्रस्ताव ग्राहकांना दिला आहे. मात्र, या कंपन्यांनी प्रीपेड ग्राहकांसाठीच दरात कपात केली आहे.
कारण या कंपन्यांसोबत असलेल्या ग्राहकांपैकी ९0 टक्के ग्राहक प्रीपेड आहेत. पोस्टपेड ग्राहकांच्या तुलनेत प्रीपेड गाहक अधिक लवकर कंपन्या बदलत असतात. त्यामुळे या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या दरकपात करत आहेत. दूरसंचार कंपन्यांना डेटा प्लानच्या माध्यमातूनच अधिक कमाई होत असते. यांच्या एकूण उत्पन्नापैकी १५ टक्के उत्पन्न इंटरनेट म्हणजेच डेटाच्या माध्यमातून मिळते. भारती एअरटेल कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी आता ६७ टक्के अधिक डेटा देऊ केला आहे. तर आयडियाने आपल्या फोर-जी आणि थ्री-जी ग्राहकांसाठी इंटरनेट डेटाचा दर ६७ टक्के स्वस्त केला
|









