रक्तदान शिबीर आणि सामूहिक विवाह सोहळ्य़ाचे आयोजन; संदेशनगरमधील साईबाबा मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात अहमदनगर- चांगले काम कर...
रक्तदान शिबीर आणि सामूहिक विवाह सोहळ्य़ाचे आयोजन;
संदेशनगरमधील साईबाबा
मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात
अहमदनगर-
चांगले काम करताना अनेक अडथळे, समस्यांचा सामना करावा लागतो. संदेशनगरला साई-बाबांच्या मंदिर उभारणीस असंख्य संकटांचा सामना, संघर्ष करावा लागला अखेर बाबांच्या कृपेनेच येथे भव्य-दिव्य मंदिर उभारणीला अनेकांचा हातभार लागल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील त्र्यंबके यांनी सांगितले.
साईनाथ मंदिराच्या तृतीत वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे तसेच सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. निखिल वारे, दत्ता जाधव, श्रीनिवास बोज्जा, दत्ता तापकिरे, विवेक त्र्यंबके, निखिल त्र्यंबके बबलू सूर्यवंशी, दत्ता टाक, अजित दिंकोडा, नीलेश पालवे, अक्षय कलंके, पविण पाटोळे, महेश टाक आदी उपस्थित होते.
या वर्धापनदिनानिमित्त साई-बाबांच्या पादूका, मूर्ती, पालखी मिरवणूक सोहळा, साई संध्या भजन, प्रवचने, कीर्तने, महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान शिबिरात ६0 युवकांनी रक्तदान केले. डॉ. प्रकाश त्र्यंबके यांनी रक्तदात्यांचा सन्मान केला. या वर्षी प्रथमच सामुदायिक विवाह सोहळा झाला. नव वधुवरांना प्रत्येकी दोन लाख रुपये विमा यावेळी उतरविण्यात आला. वधूला मंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तू यावेळी देण्यात आल्या.










