संरक्षित वास्तू नियमात बदल करा; बांधकामे मार्गी लागतील गांधी : लोकसभेत केली मागणी बांधकामे मार्गी लागतील अहमदनगर : ऐतिहासिक ...
संरक्षित वास्तू नियमात बदल करा;
बांधकामे
मार्गी लागतील
गांधी : लोकसभेत केली मागणी
बांधकामे
मार्गी लागतील अहमदनगर : ऐतिहासिक संरक्षित वास्तू अधिनियम २0१0 मध्ये अंशत: बदल करण्याची मागणी खासदार दिलीप गांधी यांनी लोकसभा अधिवेशनातील शून्य प्रहरामध्ये केली.
अहमदनगर शहरातील पुरातत्त्व विभागाच्या सात संरक्षित वास्तू आहेत. त्यामधील बहुतेक वास्तू शहराच्या मध्यभागी रहदारीच्या भागात स्थित आहेत. पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित वास्तू अधिनियम २0१0 अंतर्गत संरक्षित वास्तुच्या ३00 मीटर भागात नवीन बांधकाम करण्यास व इतर विकास कामे करण्यास बंदी आहे. संरक्षित वास्तुंचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु रहदारीच्या भागात शहरवासियांना सुविधा उपलब्ध करणे, हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे शहरवासियांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार गांधी यांनी अधिनियमात बदल करण्याची मागणी केली आहे. यामध्ये बदल झाल्यास शहरातील रखडलेली अनेक बांधकामे मार्गी लागणार आहेत, असे खासदार गांधी यांनी सांगितले.










