Archive Pages Design$type=blogging

हरेगावमध्ये मतमाऊली यात्रेची तयारी

हरेगावमध्ये मतमाऊली यात्रेची तयारी; श्रीरामपूर; प्तलुक्यातील हरेगाव येथील मतमाऊली यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यात्रा म...



हरेगावमध्ये मतमाऊली यात्रेची तयारी;श्रीरामपूर;
प्तलुक्यातील हरेगाव येथील मतमाऊली यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यात्रा महोत्सवाचे हे ६८वे वर्ष आहे. 
यात्रा १0 व ११ सप्टेंबर २0१६ला असून त्यादृष्टीने संत तेरेजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा. फ्रान्सिस खेडेकर, रेव्ह. फा. राजेंद्र लोंढे, रेव्ह. फा. संजय पठारे हे तयारीला लागले आहेत. त्यांना चर्चचे कामगार, धर्मभगिनी व धर्मबांधव मदत करीत आहेत. 
या यात्रेला राज्यातूनच नव्हे तर देशभरातून व परदेशातून मोठय़ा श्रद्धेनेभाविक येतात. यात्रेच्या ९ आठवडे अगोदर मतमाऊलीच्या मालेची ९ शनिवार नोव्हेना भक्ती सायंकाळी ५.३0 वा. असते. चर्चच्या आवारात मतमाऊलीच्या प्रतिमेची भाविकांसह मिरवणूक माऊलीच्या गीतांच्या मंजूळ सुरांनी वाजतगाजत निघते. या नोव्हेना भक्तीला जिल्हाभरातून भाविक येतात. माऊलीच्या प्रतिमेच्या मिरवणुकीनंतर निरनिराळया धर्मगुरुंचे मतमाऊलीच्या जीवनावर प्रवचन होते. त्यानंतर धर्मगुरू माऊलीच्या विशेष भक्तीची मिस्सा बलिदान अर्पण करतात व भाविकांना आशीर्वाद देतात.यात्रेच्या अगोदरपासूनच चर्च आवाराची स्वच्छता, यात्रेच्या दिवशी सुमारे ४ ते ५ लाख माऊलीच्या दर्शनासाठी, आपल्या समस्या सांगण्यासाठी व समस्या पूर्ण झालेले भाविक नवस फेडण्यासाठी येतात. त्यासाठी त्यांना माऊलीच्या डोंगरावर माऊलीच्या प्रतिमेजवळ सुरळीत जाता यावे म्हणून त्यांच्यासाठी रांगेची विशेष तयारी करावी लागते. कितीही गर्दी झाली तरी भाविकांना माऊलीचे दर्शन सुरळीत व्हावे म्हणून ठिकठिकाणी स्वयंसेवकांची योजना केली जाते. माऊलीच्या डोंगराची सजावट तसेच डोंगरावर कितीही भाविक गेले तरी डोंगराच्या मजबुतीकरणाची पाहणी, आवश्यक भासल्यास दुरुस्ती करणे आदींची तयारी करावी लागते. 
याशिवाय भाविकांना माऊलीला अर्पण करण्यासाठी फुले, फुलमाला, मेणबत्या आदी साहित्याच्या दुकानांची व्यवस्था करणे हे साहित्य अगोदरच उपलब्ध करावी लागते. याशिवाय यात्रेच्या दिवशी सकाळी ७ वाजताच विशेष भक्ती मिस्सा बलिदानाला चर्चमध्ये सुरुवात होते. ही भक्ती प्रत्येक तासातासाच्या अंतराने रात्री १२ वाजेपर्यंत असते. या भक्तीला हजारो भाविक असतात. जागेअभावी कुणीही वंचित राहू नये याची सर्व व्यवस्था अगोदरच करावी लागते. तसेच यात्रेच्या दिवशी माऊलीच्या प्रतिमेची मिरवणूक सुरळीत व्हावी यासाठी पूर्ण नियोजन करावे लागते. आपले नवस व्यवस्थित करता यावेत, देणग्या व्यवस्थित देता याव्यात आदींची व्यवस्था करावी लागते. यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे यात्रेच्या अगोदर ९ दिवस दररोज सायंकाळी ५.३0 वाजता माऊलची नोव्हेना भक्ती मिस्सा बलिदान निरनिराळया चर्चच्या धर्मगुरुंचे माऊलीच्या जीवनावर माहितीपूर्ण प्रवचन व आशीर्वादाचा कार्यक्रम असतो. त्याचेही नियोजन करावे लागते. या सर्व बाबींची जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: हरेगावमध्ये मतमाऊली यात्रेची तयारी
हरेगावमध्ये मतमाऊली यात्रेची तयारी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuXKkcId0fWQJctzeSpMjl2-I9989A1znHlAYUK_7bY9bCL_ouiE-SmIr-iD_GTXS1Tz7Rb1lvEpH1HfFXiMJtrZn97LY2H2m23e8Aq8Hf0-_ZK34xXkHGF1CxQf1jv-M-uFRrkqB0sQrh/s200/Lss+news.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuXKkcId0fWQJctzeSpMjl2-I9989A1znHlAYUK_7bY9bCL_ouiE-SmIr-iD_GTXS1Tz7Rb1lvEpH1HfFXiMJtrZn97LY2H2m23e8Aq8Hf0-_ZK34xXkHGF1CxQf1jv-M-uFRrkqB0sQrh/s72-c/Lss+news.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_329.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_329.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago