मूकमोर्चा, निषेधसभा आणि तणावभाळवणीकोपर्डीटाकळीढोके कर्जत - कोपर्डी येथील गुन्ह्याचे येत्या 30 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल कर...
| मूकमोर्चा, निषेधसभा आणि तणावभाळवणीकोपर्डीटाकळीढोके |
कर्जत - कोपर्डी येथील गुन्ह्याचे येत्या 30 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करून हा खटाला ज़लदगती न्यायालयात चालवू तसेच या गुन्ह्यातील आरोपींना कड़क शिक्षा होण्याच्या दृष्टीने तपास करण्यात येईल, अशी ग्वाही पुणो शहराच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली. पोलिस आयुक्त शुक्ला यांनी आज़ दि. 20 रोज़ी घटनास्थळी भेट दिली, या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी पोलिस अधिकारी व स्थानिक नागरिक यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांशी संवाद साधताना, त्यांनी सदर घटना अत्यंत दुर्दैवी असून, या गुन्ह्यात सरकारची बाज़ू मांडण्यासाठी शासनाने अँड़ उज्•वल निकम यांची नियुक्ती केली आहे. आजपासून पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात येत असून,महाराष्ट्र पोलिसांमार्फत'प्रतिसाद'नावाचे अँप सुरू करण्यात येणार आहे. स्मार्ट फोनद्वारे तक्रार केल्यास पोलिस मदत मिळेल. एसएमएससाठी शुक्ला यांनी शुक्ला यांनी स्वत:चा मोबाईल नंबर विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिला आहे. लोकांच्या तीव्र भावना समजून घेत शुक्ला यांनी कुळधरण येथील शालेय विद्यार्थिनींची भेट घेऊन त्यांच्याशीही सवांद साधला. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी तत्काळ विद्यार्थिनींसाठी कोपर्डी ते कुळधरण बस सुरू होईल. तसेच कुळधरण येथे पोलिस चौकीच्या प्रस्तावबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून कोपर्डी ते कुळधरण पक्क्या रस्त्यासाठी प्रय▪करू.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन राहाटकर यांनी या वेळी दिले. त्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनीही घटनास्थळी भेटी दिल्या. शासकीय मदत:- पीड़ित मुलीच्या कुटुंबियाना राज्य शासनातर्फे मनोधैर्य योजने अंतर्गत आणि निर्भया योजने अंतर्गत मदत देण्यात आली आहे.










