खातेदारांच्या दु:खाच्या क्षणी मदत करणे हे आद्यकर्तव्य कडूभाऊ काळे यांचे प्रतिपादनअहमदनगर/ खातेदारांच्या दु:खाच्या क्षणी मदत कर...
खातेदारांच्या दु:खाच्या क्षणी मदत करणे हे आद्यकर्तव्यकडूभाऊ काळे यांचे प्रतिपादनअहमदनगर/प्रतिनिध
श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्व खातेदार म्हणजे आमच्याच कुटुंबातीलच घटक असून, त्यांची सर्व सुख-दु:खे आमचीच आहेत. त्यांच्या दु:खाच्या क्षणी मदत करणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे, असे प्रतिपादन सोसायटीचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी केले.
श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे दोन मयत खातेदारांच्या वारसांना अपघात विम्याच्या रकमेचे धनादेश नुकतेच प्रदान करण्यात आले. या दोघा खातेदारांचे बचत खाते शेवगाव व घोडेगाव शाखेत होते. अपघात विमा रकमेचा धनादेश संस्थेच्या नगर येथील मुख्य शाखेतर्फे प्रदान करण्यात आला, यावेळी श्री. काळे बोलत होते.
संस्थेच्या शेवगाव शाखेमध्ये सोनाली महेश मुनोत यांचे बचत खाते होते. दि.२१ जून रोजी त्यांचा नगर-शेवगाव रोडवर अपघात होऊन मृत्यू झाला. त्यांचे पती महेश शांतीलाल मुनोत यांनी विम्याच्या रकमेपोटी अपघात विमा मिळण्यासाठी अर्ज केला होता. श्री.मुनोत यांना १ लाख रुपयांची अपघात विमा रक्कम देण्यात आली.
घोडेगाव शाखेतील खातेदार विजय रंगनाथ येळवंडे यांचा २९ डिसेंबर २0१५ रोजी पागिरे पेट्रोल पंपाजवळ अपघात होऊन मृत्यू झाला. त्यांचे आवर्ती ठेव योजना तसेच बचत खाते घोडेगाव शाखेत होते. त्यांच्या खात्यावर ते नियमित ५00 रुपये प्रतिमहिना भरणा करीत होते. परंतु त्यांचे अचानक अपघाती निधन झाले. त्यांचे वडिल रंगनाथ सोन्याबापू येळवंडे यांनी अपघात विमा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांना ५0 हजार रुपयांची अपघात विमा रक्कम देण्यात आली.
|









