वाडेंगव्हाणमध्ये दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत महिला ठार प्रतिनिधी : पारनेर पारनेर तालुक्यातील वाडेंगव्हाणजवळील तांनवडे मळा येथे गुरुवा...
वाडेंगव्हाणमध्ये दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत महिला ठार
प्रतिनिधी : पारनेर
पारनेर तालुक्यातील वाडेंगव्हाणजवळील तांनवडे मळा येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडला. दरोडेखोरांच्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून महिलेला मारहाण करत मोठा ऐवज लंपास केला.मृत महिलेचे नाव नाव समजू शकले नाही. या संदर्भातील पंचनामा व इतर कार्यवाहीचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते. परिसरात चोऱ्या दरोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे










