शिर्डी संस्थानमध्ये विखे यांना डावलले सर्मथकांकडून आंदोलने : उपाध्यक्षपद न मिळाल्याने शिवसेनाही नाराज; सबकुछ भाजप.. तब्बल चार...
शिर्डी संस्थानमध्ये
विखे यांना डावलले
सर्मथकांकडून आंदोलने : उपाध्यक्षपद न मिळाल्याने शिवसेनाही नाराज;
सबकुछ भाजप..
तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ शुक्रवारी जाहीर केले. संस्थानच्या अध्यक्षपदी विज्ञानातील संशोधक व बांधकाम व्यावसायिक तसेच भाजपचे कार्यकर्ते सुरेश हावरे तर उपाध्यक्षपदी भाजपचेच माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक आमदार राधाकृष्ण विखे यांचा विश्वस्तांत समावेश नसल्याने त्यांच्या सर्मथकांना धक्का बसला आहे. उपाध्यक्षपद न मिळाल्याने सेनेनेही विश्वस्त मंडळातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
तीन वर्षांसाठी बारा सदस्यीय विश्वस्त मंडळाची अधिसूचना निघाली आहे. विश्वस्थांमध्ये डॉ. मनिषा शामसुंदर कायंदे (नाशिक), सचिन भागवत तांबे (शिर्डी), अँड. मोहन मोतीलाल जयकर (मुंबई), प्रताप सखाहारी भोसले (श्रीरामपूर), डॉ. राजेंद्र राजाबली सिंग, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), बिपीन कोल्हे (कोपरगाव), रवींद्र गजानन मिर्लेकर (मुंबई), (पान १0 वर) शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळात शिवसेनेला उपाध्यक्ष पद देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यांनी तो शब्द न पाळल्याने आम्हाला विश्वस्त मंडळात राहण्यात रस नसून आम्ही बाहेर पडणार असल्याचा गर्भित इशारा शिवसेनेचे नवनियुक्त विश्वस्त रवींद्र मिर्लेकर यांनी दिला आहे. कायंदे, मिर्लेकर व किर्तीकर हे सेनेचे तीन सदस्य विश्वस्त मंडळात आहे. ■ जिल्ह्यातील राहुरीचे चंद्रशेखर कदम , शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे व सचिन तांबे, श्रीरामपूरचे प्रताप भोसले, कोपरगावचे बिपीन कोल्हे यांचा विश्वस्त मंडळात समावेश करण्यात आला आहे. हे सर्व भाजप व संघाशी संबंधित आहेत. शिवसेना तसेच दोन्ही कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील एकाही नेत्याला विश्वस्त मंडळात स्थान मिळालेले नाही
.
|










