गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वधर्मीय गुरूंचा सत्कार; गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वधर्मीय गुरूंचा सत्कार करताना अभय आव्हाड,बंडू बोरुडे, ...
गुरुपौर्णिमेनिमित्त
सर्वधर्मीय गुरूंचा सत्कार;

गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वधर्मीय गुरूंचा सत्कार करताना अभय आव्हाड,बंडू बोरुडे, डॉ. जी. पी. ढाकणो, रेश्मा सातपुते, सुभाष शेकडे आदी. (छाया- राज़ेंद्र सावंत, पाथर्डी)पाथर्डी/प्रतिनिधी-
बाह्य रुपापेक्षा अंतर्गत सौंदर्य मनुष्याला प्रगतीकडे घेऊन जाते. शांतता ही सर्व धर्मीयांची गरज बनली आहे. महाविद्यालयीन जीवनात नीतिमूल्य संवर्धनाचे धडे देण्याचे काम येथील शैक्षणिक संस्था करीत आहेत, याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन ब्रम्हाकुमारी सुवर्णादिदी यांनी केले. गुरू पौर्णिमेनिमित्ताने येथील सर्वधर्मीय सत्पुरुष व महिला भगींनीचा अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने गौरव करण्यात आला, या वेळी सुवर्णादिदी बोलत होत्या. मौलाना सैफउद्दीन शेख, शकुंतला माता, माधवबाबा, हाजी हाफीजभाई शेख,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, प्राचार्य उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, डॉ. जी. पी. ढाकणो, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या रेश्मा सातपुते, डॉ. सुभाष शेकडे, किरण गुलदगड, डॉ. अशोक कानडे आदी या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन मन्सूर शेख यांनी केले. डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले.









