रिओ ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनपटूंना फिरोदिया फाऊंडेशन व 'लक्ष्य'चे सहकार्य; अहमदनगर - रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या पुर...
अहमदनगर -
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष बॅडमिंटन दुहेरीचे खेळाडू सुमीत रेड्डी आणि मनू अत्री यांना नगर येथील शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशन व पुण्यातील लक्ष्य संस्था मदत करणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे जनरल सचिव नरेंद फिरोदिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऑलिम्पिकमध्ये भारताचे स्वप्न साकारण्यासाठी लक्ष्य आणि फिरोदिया फाऊंडेशन एकत्रित प्रय▪करीत आहे. फाऊंडेशनच्या वतीने बुद्धिबळ, बॅडमिंटन, शरीरसौष्ठव, क्रिकेट, किक बॉक्सिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, योगा या खेळांना व खेळाडूंना आर्थिक पाठबळ देण्यात येते. ग्रॅण्डमास्टर शादरुल गागरे (बुद्धिबळ), संकर्ष शेळके (बुद्धिबळ), सागर जाधव (शरीरसौष्ठव), नीलेश शेलार (किक बॉक्सिंग) या खेळाडूंना यापूर्वी फाऊंडेशनने आर्थिक सहयोग दिला आहे. मनू अत्री हा खेळाडू मूळचा लखनौचा असून सुमीत रेड्डी हा मूळचा हैदराबादचा आहे. सध्या दोघेही हैदराबाद येथे ऑल्पिकसाठी सराव करीत आहेत.
लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया म्हणाले की, विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या क्रीडापेमींना एकत्र आणून सन २00९ मध्ये लक्ष्य या खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणार्या संस्थेची निर्मिती केली आहे. देशातील क्रीडा क्षेत्रातील चांगले खेळाडू शोधून त्यांना विविध सुविधा देण्याबरोबरच त्यांना आहाराबाबत मार्गदर्शन करणे, इजा व्यवस्थापन करणे, समुपदेश्न करणे, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे, त्याचबरोबर खेळाडूंच्या पालकांचेही समुपदेशन करणे अशी एकाच छत्राखाली ३६0 अंशांची मदत लक्ष्यच्या वतीने करण्यात येते. गॅ्रण्डमास्टर अभिजीत कुटे म्हणाले की, यापूर्वी २0१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यचे पाच खेळाडू सहभागी झाले होते. यंदा ७ खेळाडू सहभागी होणार आहेत. सशक्त आणि स्वस्थ भारत निर्माण करणार्या लक्ष्यच्या वतीने प्रय▪करण्यात येत असून, त्याला फिरोदिया फाऊंडेशनचेही सहकार्य मिळते. सुमीत आणि मनू हे बॅडमिंटनपटू ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देतील असा विश्वास कुटे यांनी व्यक्त केला
| . |










