'कोपर्डी' गुन्ह्यातील मुख्य आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी अहमदनगर ; कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुल...
अहमदनगर ;
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार व खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी (दि.२८) जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.पांडे यांच्यासमोर हजर केले असता शिंदे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यावेळी न्यायालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याला बुधवारी (दि.२७) न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. यावेळी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अँड़सतीश पाटील यांनी प्रखर युक्तिवाद केला होता. या गुन्ह्यात आरोपी शिंदे याला एकूण १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी शिंदे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी (दि.२८) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या गंभीर गुन्ह्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड सताप आहे. त्याच कारणामुळे आरोपींच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी आरोपींवर अंडे तसेच महिला कार्यकर्त्यांकडून चप्पलफेकीचा प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर आज न्यायालयाच्या आवारात महिला पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, कोतवाली पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.










