शिर्डी/प्रतिनिधी : साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित श्री गुरुपौर्णिमा उत्सवा;; मोठय़ा मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. उत्सवानिमित्त साईमंदि...
शिर्डी/प्रतिनिधी : साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित श्री गुरुपौर्णिमा उत्सवा;; मोठय़ा मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. उत्सवानिमित्त साईमंदिर व परीसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घे
![]() |
साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित श्री गुरुपौर्णिमा उत्सवास मोठय़ा मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. उत्सवानिमित्त साईमंदिर व परीसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साईनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेला
यंदा पुणे येथून आलेल्या साईबाबा पालखी समितीच्या पालखीत सुमारे तीन हजार भाविक सहभागी झाले होते. महिलांनी परिधान केलेला पुणेरी फेटा, देशी- विदेशी फुलांची पालखीस केलेली सजावट आकर्षक ठरली. बैगलोर येथील दानशूर साईभक्त के. सी. सुब्रमणी यादव यांच्या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची उत्कृष्ट अशी सजावट तर मुंबई येथील साईराम डेकोरेटर्स यांनी विद्युत रोषणाई केली होती. या रोषणाईने मंदिर व परिसर उजाळुन निघाला.
उत्सवाच्या प्रारंभी श्रींच्या प्रतिमेची व साईसच्चरीत या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी पोथी, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदिप आहेर, मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांनी प्रतिमा तर मंदिर पुरोहीत विलास जोशी यांनी विणा घेऊन सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे अधिकारी व ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाईत आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरीत या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी प्रथम अध्याय व उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदिप आहेर यांनी द्वीतीय अध्याय वाचन करुन केला. समाधी मंदिरात पाद्यपुजा बाजीराव शिंदे त्यांच्या सुविद्य पत्नी सिमा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी डॉ. संदिप आहेर त्यांच्या पत्नी कल्पना आहेर उपस्थित होते. दुपारी मध्यान्ह आरती झाली. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ह.भ. प. माधवराव आजेगावकर यांचे कीर्तन झाले. रात्रौ ७-३0 वाजता के. स्वर्ण श्री. विजयवाडा यांचा कुचिपुडी नाट्य व साईभक्ती संगित हा कार्यक्रम तर रात्रौ ९ वाजता प्रेमानंद कृष्णा कोचरेकर, गोवा याचा गोमन्तकातील वैशिष्ट्यपुर्ण घुमटावरील आरत्या हा कार्यक्रम समाधी मंदिरा शेजारील स्टेजवर संपन्न झाला. श्रींच्या पालखीची शहरातुन रात्रौ ९-१५ वाजता भव्य मिरवणुक काढण्यात आली. यात मोठया संख्येने ग्रामस्थ व साईभक्त सहभागी झाले होते. साईनामाच्या जयघोषाने शिर्डी दुमदुमली होती.
उद्या उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असून श्री साईसच्चरीत या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती होणार आहे. सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. माधवराव आजेगांवकर याचे कीर्तन होणार असून सायंकाळी ७ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७-३0 वाजता उमाशंकरजी महाराज, बाराबंकी यांचा साईभजनाचा कार्यक्रम तर रात्रौ ९ वाजता दिपीका गील, दिल्ली यांचा साईभजन संध्या हा कार्यक्रम समाधी मंदिराशेजारील स्टेजवर होणार आहेतले. साईनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन










