कीर्तन-प्रवचनाने समाजाचे प्रबोधन होते : आ. अरुण जगताप; अहमदनगर ; सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत...
कीर्तन-प्रवचनाने समाजाचे प्रबोधन होते : आ. अरुण जगताप;
अहमदनगर ;
![]()
सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध, लोकसंग्रह,कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बा' अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भिडभाड ठेवली नाही, अशा या थोर संतांच्या विचारांचे कीर्तन - प्रवचनातून समाजाचे प्रबोधन होते, असे प्रतिपादन आ.अरुण जगताप यांनी केले.
माळीवाडा येथे सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे उद््घाटन आ.अरुण जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, विशाल गणपती मंदिरचे अध्यक्ष अँड़अभय आगरकर, संगमनाथ महाराज, गंगानाथ महाराज, विश्वनाथ राऊत, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, दत्तात्रय कावरे, अविनाश घुले, किशोर डागवाले, अनिल बोरुडे, बाळासाहेब आरडे, दत्ता जाधव, मोहन कदम, सावता उत्सव समितीचे अध्यक्ष छबूराव जाधव, सोमनाथ गाडळकर, कैलास खरपुडे, माणिक बनकर, अशोक जाधव, विशाल पटवेकर, सोमनाथ रोकडे, कैलास मोकाटे, सतीश डागवाले, ज्ञानेश्वर घटमाळ, नितीन शेरकर, बाबासाहेब पटवेकर, रमेश चौधरी, सुभाष सांगळे, कैलास सुडके, राहुल फुलसौंदर, विनायक आंबेकर, दत्तात्रय पटवेकर, हर्षल म्हस्के, बाळासाहेब पुंड, जालिंदर बोरुडे आदि उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलशपूजन, वीणा पूजन, प्रतिमा पूजन, ग्रंथपूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास पंडित खरपुडे, अशोक कानडे, बाबासाहेब सुडके, विजय कोथिंबीरे, भाऊसाहेब फुलसौंदर, गजानन ससाणो, अशोक कापरे, डॉ.सुदर्शन गोरे, गोरख पडोळे, हभप खेसे महाराज, हभप जालिंदर महाराज निकम, सुनील राऊत, मूलचंद नरसळ, चंद्रकांत ताठे, सतीश डागवाले, बजरंग भुतारे, सुनील आंबेकर,श्याम व्यवहारे, विष्णूपंत म्हस्के, अभि फुलसौंदर आदि उपस्थित होते. सप्ताह यशस्वीतेसाठी संत सावता माळी उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू शिंदे यांनी केले तर आभार सोमनाथ गाडळकर यांनी मानले.
|










