नागरिकांचा आंदोलनाचा इशारा; चिचोंडी पाटील परिसरात बीएसएनएलची सेवा विस्कळी अहमदनगर ; चिचोंडी पाटील व परिसरातील अनेक गावांना बीए...
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा;
चिचोंडी पाटील परिसरात बीएसएनएलची सेवा विस्कळी
अहमदनगर ;
चिचोंडी पाटील व परिसरातील अनेक गावांना बीएसएनएल मोबाईलला रेंज मिळत नाही. लॅण्डलाईन कनेक्शनही बंद पडतात, तसेच चिचोंडी पाटीलमध्ये जवळपास वीस ते पंचवीस इंटरनेटचे ब्रॉडबॅण्ड कनेक्शनधारक असून. इंटरनेट सुविधा दिवसातून ४ ते ५ तास बंद पडते. कधी कधी दोन दोन दिवस बंदच राहते. त्यामुळे बॅंकांचे व्यवहार, सेतू कार्यालय बंद पडतात. त्यामुळे ग्रामस्थांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रसचे तालुकाअध्यक्ष अशोक कोकाटे यांनी अहमदनगरच्या बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,चिचोंडी पाटीलच्या बीएसएनएल ऑफीसमध्ये चौकशी केली असता बॅटरी खराब असल्याचे सांगतात. त्यामुळे महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्यास बीएसएनएलच्या सर्व सुविधा बंद पडतात. या बाबतची तक्रार अधिकार्यांकडे करूनही ते उपाययोजना करत नाहीत, केवळ वरिष्ठांकडे बोट दाखवतात. या प्रकाराने पंचक्रोशीतील ग्रामस्थांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. तरी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा जर येत्या आठ दिवसांमध्ये चिचोंडी पाटील व परिसरातील नागरिकांच्या हितासाठी आपणाविरोधात तीव स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा अशोक कोकाटे, पकाश ठोंबरे, केशव बेरड, राहुल शेवाळे, मयुर खुशालचंद बोरा, कैलास अंबादास खांदवे, बंडू महादेव खराडे, गजु कांबळे, बाळासाहेब वाळके आदींनी दिला आहे.









