नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा व अखंडनाम सप्ताह; अहमदनगर; संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पुण...
नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त
ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा व अखंडनाम सप्ताह;

अहमदनगर;
संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त डावरे गल्ली येथील नामदेव विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा व अखंडनाम सप्ताहास विविध धार्मिक कार्यक्रम व खा.दिलीप गांधी व सौ.सरोज गांधी यांच्या हस्ते महाआरतीने या सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सकाळी अखंड हरिनाम सप्ताहाची संकल्प पूजा नामदेव शिंपी समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे व राजश्री मांढरे यांच्या हस्ते झाली. वीणा पूजन राऊत गुरुजी, अशोक जाधव, संजय काळे, महेश जाधव, प्रकाश औटी यांनी केले. मांढरे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन, ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ज्ञानेश्वर पवार, शरद गीते, दिलीप गीते, अनिल गीते, डॉ.संजय गीते, शंकरराव चौगुले, प्रसाद मांढरे, सतीश वाधवणो, ज्ञानेश्वर कविटकर, अरुण जवळेकर, रवींद्र क्षित्रे, सुरेश चुटके, श्रीकांत साठे, खेडचे सरपंच मोरे पाटील, उद्योजक सतीश झिक्रे, अशोक जाधव, मालती पवार, अनिता गीते, संजीवनी गीते, माधवी मांढरे, शोभा गीते, छाया रजपूत आदिसह समाज बांधव उपस्थित होते.









