ढवळपुरी येथे पोलिसांविरुध्द उपोषण; (छाया:- अभिज़ित कपाळे, भाळवणी.)भाळवणी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील जागृती दारुबं...
ढवळपुरी येथे पोलिसांविरुध्द उपोषण;

(छाया:- अभिज़ित कपाळे, भाळवणी.)भाळवणी
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील जागृती दारुबंदी महिला कृती समितीच्या वतीने पोलिस व दारूबंदी विभागाच्या विरोधात ग्रामपंचायत चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी निघोज दारुबंदी चळवळीचे बबनराव कवाद, जवळा येथील रामदास घावटे तसेच ढवळपुरी दारुबंदी चळवळीचे मार्गदर्शक सुरेश भालेराव, गणोश जाधव, मनोजकुमार साळवे, बाळू गवळी, संतोष थोरात उपस्थित होते. उपोषणाला बसण्यापूर्वी सर्व महिलांनी गावातून फेरी मारली. दारुबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली भालेराव, इंदुबाई बिडे, ग्रापं. सदस्या शालन पांडे, शारदा मोरे, मिराबाई शिंदे, कविता मोरे, उमाताई थोरात, कौसाबाई धायगुडे, सिंधुबाई पारखे, संगीता आदमाने आदी उपोषणाला बसल्या आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून डॉ. सईद काझी, डॉ. इंद्रजित भिसे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक चोरमले, तालुकाध्यक्ष गंगाराम कोळेकर यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. या वेळी राज्य उत्पादन शुल्कचे एस. आर. घायतडक यांनी भेट दिली









