शासकीय सेवेत सामावून घ्या पारनेर : राज्यातील बाजार समित्यांवरील नियमन उठवल्यामुळे बाजार समित्या ओस पडून कर्मचार्यांचेही हाल होणार...
|
शासकीय सेवेत सामावून घ्या
|
पारनेर : राज्यातील बाजार समित्यांवरील नियमन उठवल्यामुळे बाजार समित्या ओस पडून कर्मचार्यांचेही हाल होणार आहेत. त्यामुळे आम्हाला शासनाने प्रशासकीय सेवेत सामावून घ्यावे, असे साकडे पारनेर बाजार समितीच्या सेवकांनी सहकारमंत्र्यांना घातले आहे.
शासनाने राज्यातील बाजार समित्यांवरील विविध फळभाज्या व शेतीमालासह इतर उत्पादनांचे नियमन व बाजार शुल्क हटविण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील बाजार समित्यांना मिळणारे उत्पन्न बंद होणार आहे. त्यामुळे बाजार समितीतील कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे शासनाने या सेवकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, असे साकडे बाजार समितीचे प्रभारी सचिव शिवाजी पानसरे, शिंदे, चेडे व सेवकांनी केली आहे |










