जॉन्सस शेक्सपिअर यांची माहिती : चर्चमधील गोंधळाबाबत शुक्रवारी उपोषण करणार ह्यूम चर्चच्या मॉडरेटरांची नियुक्ती रद्द येथील ऐतिहासि...
जॉन्सस शेक्सपिअर यांची माहिती : चर्चमधील गोंधळाबाबत शुक्रवारी उपोषण करणार
ह्यूम चर्चच्या मॉडरेटरांची नियुक्ती रद्द
येथील ऐतिहासिक अहमदनगर पहिली मंडळीचे ह्यूम मेमोरियल चर्चवर हंगामी मॉडरेटर म्हणून सनी पंडित मिसाळ यांनी केलेला दावा युसीएनआयच्या जनरल न्याय समितीने फेटाळला असून त्यांची नियुक्ती अनधिकृत असल्याने रद्द केली असल्याचा दावा सचिव जॉन्सस शेक्सपिअर यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केला आहे.
शेक्सपिअर म्हणाले, सनी मिसाळ हे निरोप्याची मंडळी, बुरुडगाव व सुनील पांडुरंग भांबळ हे दैठण गुंजाळ चर्चचे धर्मगुरु असल्याने त्यांना ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. पहिली मंडळीचे ज्येष्ठ पालक ख्रिस्तवासी रेव्हरंड डॉ. सी. बी. उजागरे यांनी चर्च कौन्सिलतर्फे रेव्हरंड विद्यासागर भोसले व रेव्हरंड पी. जी. मकासरे यांना धर्मगुरुची दीक्षा देऊन त्यांची चर्चच्या सेवेत नियुक्ती केलेली आहे. ते रेव्हरंड डॉ. उजागरे यांना सेवा कार्यात मदत करीत होते व आजही सेवा कार्य करीत आहेत. रेव्हरंड सी. बी. उजागरे यांच्या निधनानंतर सनी पंडित मिसाळ व पी. जी. भांबळ आणि त्यांचे हस्तक खोट्या कागदपत्राच्या आधारे अहमदनगर पहिली मंडळीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रय▪करीत आहेत, असेही देखील ते म्हणाले.
पुणे येथील सह धर्मादाय आयुक्त यांच्याकडे १३ नोव्हेंबर २0१४ ला विद्यमान विश्वस्तांची कायदेशीर नेमणूक केली असताना ते विश्वस्तांना हेतूपुरस्सर बदनाम करत असल्याचे शेक्सपिअर यांनी कागदपत्रांचे विविध दाखले देत सांगितले. सनी मिसाळ, भांबळ व त्यांच्या हस्तकांवर चर्चमध्ये गोंधळ घालणे, कामकाजात हस्तक्षेप करणे, विश्वस्तांविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करणे, बनावट दस्तऐवज करुन फसवणूक केल्याप्रकरणी त्वरित गुन्हे दाखल न झाल्यास व संबंधित लोकांनी चर्चमधील गोंधळ न थांबवल्यास अहमदनगर पहिली मंडळी कॉँग्रेसशनलचे कार्यकारी विश्वस्त मंडळ व सभासदांतर्फे शुक्रवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शेक्सपिअर यांनी यावेळी दिला. धर्मगुरु पी. जी. मकासरे, विद्यासागर भोसले, सर्वश्री एन. बी. जाधव, महेंद्र भोसले, हेमंत पाडळे, अनिल अंधारे, निशा कदम, मार्गारट जाधव आदी यावेळी उपस्थित होते.










