कारगिल विजय दिनानिमित्त वीरपत्नी जाधव यांचा सन्मान अहमदनगर ; कारगिल युद्धात अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या युद्धात नगर ...
कारगिल विजय दिनानिमित्त वीरपत्नी जाधव यांचा सन्मान
अहमदनगर ;

कारगिल युद्धात अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या युद्धात नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथील जवान जगन्नाथ जाधव यांना वीरमरण प्राप्त झाले. आज कारगिल विजय दिनानिमित्त वीरपत्नी सविता जगन्नाथ जाधव यांचा शहर सकहारी बँकेच्यावतीने सन्मान केला. जवान जगन्नाथ जाधव शहीद झाल्यापासून बँकेने सामाजिक बांधिलकी जपत जाधव कुटुंबीयांना आधार देण्याचे काम केले. असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष डॉ. विजय भंडारी यांनी केले. कारगिल विजय दिनानिमित्त वीरपत्नी सविता जगन्नाथ जाधव यांचा अ.नगर शहर सहकारी बँकेच्या वतीने सन्मान अध्यक्ष डॉ. विजय भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा, सीए गिरीश घैसास, अशोक कानडे, मचिं्छद्र क्षेत्रे, शिवाजी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. वाय. कुलकर्णी, विशेष कार्यकारी अधिकारी जवाहर कटारिया, उपकार्यकारी अधिकारी तन्वीर खान, राठोड सर, दत्ता रासकोंडा, पांडुरंग आडसुरे आदी उपस्थित होते
| . |









