ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यास प्रारंभ; ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ खा. दिलीप गांधी व सरोज गांधी यांच्या ह...
ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यास प्रारंभ;

ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ खा. दिलीप गांधी व सरोज गांधी यांच्या हस्ते महाआरतीने करण्यात आला. अहमदनगर : श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त डावरे गल्ली येथील नामदेव विठ्ठल मंदिरात आयोजित ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ खा. दिलीप गांधी व सरोज गांधी यांच्या हस्ते महाआरतीने करण्यात आला.
रविवारी सकाळी अखंड हरिनाम सप्ताहाची संकल्प पूजा नामदेव शिंपी समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे व राजश्री मांढरे यांच्या हस्ते झाली. वीणा पूजन राऊत गुरुजी, अशोक जाधव, संजय काळे, महेश जाधव, प्रकाश औटी यांनी केले.
श्रीकांत मांढरे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ज्ञानेश्वर पवार, शरद गीते, दिलीप गीते, अनिल गीते, डॉ. संजय गीते, शंकरराव चौगुले, प्रसाद मांढरे, सतीश वाधवणे, ज्ञानेश्वर कविटकर, अरुण जवळेकर, रविंद्र क्षित्रे, सुरेश चुटके, श्रीकांत साठे, खेडचे सरपंच मोरे, उद्योजक सतीश झिक्रे, अशोक जाधव, मालती पवार, अनिता गीते, संजीवनी गीते, माधवी मांढरे, शोभा गीते, छाया रजपूत आदी उपस्थित होते.
सायंकाळी निळकंठ देशमुख महाराज यांनी कथा सप्ताहाला प्रारंभ करुन ज्ञानेश्वरीचे विवेचन केले. रात्री शैलेंद्र गांधी यांचा अमृताची गोडी हा भाव भक्तीगीताचा कार्यक्रम झाला. या सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.









