'भिंगार कॅन्टोन्मेंटचे प्रश्न राष्ट्रवादी युवकने सोडवले'; अहमदनगर - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भिंगारमध्ये चांगले काम ...
'भिंगार कॅन्टोन्मेंटचे प्रश्न राष्ट्रवादी युवकने सोडवले';
अहमदनगर -
![]()
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भिंगारमध्ये चांगले काम सुरू आहे. समाजासाठी भरीव असे योगदान त्यांनी दिले आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यात राष्ट्रवादी युवकने भिंगारमध्ये आघाडी घेतली आहे. भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कॅन्टोन्मेंटचे अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधून ते सोडवून घेतले, असे प्रतिपादन आमदार अरुण जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर संघटकपदी मतीन सय्यद यांची नियुक्ती करून आ. जगताप यांनी सत्कार केला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, कॅन्टो. सदस्य कलीम शेख, सुरेश मेहतानी, विभागप्रमुख संजय खताडे, अमित खामकर, नईम शेख, सारंग पंधाडे, समीर खान, वैभव ढाकणो, अमित खामकर, खालीद शेख, सागर गुंजाळ, राजेंद्र कचरे आदी उपस्थित होते.
समाजहिताचे अनेक प्रश्न आमदार निधीतून मार्गी लावले आहेत. विविध विकासकामे भिंगारमध्ये झाली आहेत. त्यामुळे सय्यद यांचे कार्य पाहून आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक शहर संघटकपदी नियुक्ती करून जबाबदारी देण्यात आली असल्याचे श्री. जगताप म्हणाले.
सय्यद म्हणाले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर संघटकपदी आ. जगताप यांनी आपली नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. या संधीचे सोने करू. अधिक चांगले काम करण्याचा प्रय▪केला जाईल. भिंगारमध्ये अजूनही मोठ्या संख्येने प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्याकामी आ. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रय▪करू, असे ते म्हणाले.
|










