कोपर्डीतील मुलींसाठी भैय्यूजी महाराजांकडून दोन स्कूल बसेस; बोरा कोपर्डी येथे घडलेल्या अमानुष घटनेनंतर येथील मुलींना शाळेत...
कोपर्डीतील मुलींसाठी भैय्यूजी महाराजांकडून दोन स्कूल बसेस;

बोरा कोपर्डी येथे घडलेल्या अमानुष घटनेनंतर येथील मुलींना शाळेत सुरक्षित ज़ाण्यासाठी भैय्यूजी महाराज यांच्या सवरेदय संस्थेमार्फत अद्यावत व सर्वसुविधांनी युक्त असलेल्या दोन स्कूल बसेस •येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पीडित मुलीच्या आईकडे सुपूर्द करण्यात आल्या.
दरम्यान, कोपर्डी येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची आज •येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे,आध्यात्मिक गुरू भैयुजी महाराज, कॉंग्रसेचे माज़ीमंत्री हर्षवर्धन पाटील, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार,आ. विद्या चव्हाण व समाज़सेवक बाबा आढाव यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी हज़ारे व भैय्यूज़ी महाराज़ या दोघांनी बराच काळ कुटुंबीयांबरोबर चर्चा करत आम्ही आपल्याबरोबर आहोत, असा दिलासा दिला. कर्जत तालुक्यातील अमानुष अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांची रोज़ विविध मान्यवर भेट घेत आहेत. त्यामुळे हे कुटुंबीय अत्यंत त्रस्त झाले आहे. आज •येष्ठ समाजसेवक व हमाल -मापाडी संघटनेचे प्रमुख बाबा आढाव यांनी या कुटुंबीयाची भेट घेऊन धीर दिला.









