सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त माळीवाड्यात सप्ताह; अहमदनगर- श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त उत्सव समितीतर्फे २ ऑगस्ट...
सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त माळीवाड्यात सप्ताह;
अहमदनगर-
![]()
श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त उत्सव समितीतर्फे २ ऑगस्टपर्यंत माळीवाडा येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे छबुराव जाधव यांनी दिली.
मंडप उभारणीच्या कामाचा प्रारंभ करताना छबुराव जाधव, कैलास खरपुडे, विकास पटवेकर, सतीश डागवाले, मंदार सटाणकर, भाऊसाहेब पुंड, शिवाजी जाधव, भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते. सप्ताहाचे यंदाचे दहावे वर्षे असून आमदार अरुण जगताप, विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष अँड़ अभय आगरकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २६) सकाळी दहा वाजता कलश पूजन होईल. श्री संगमनाथ महाराज (गुरु गेंडानाथ), श्री. गंगानाथ महाराज (गुरुगेंडानाथ), विश्वनाथ राऊत यांच्या हस्ते वीणा पूजन, तर आमदार संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेविका सुवर्णा जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल.
अश्विनी म्हात्रे महाराज (मुंबई), दत्तात्रय अंकुशकर महाराज (बुलढाणा), समाजप्रबोधनकार नवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर), समाधान शर्मा महाराज (बीड), रामायणाचार्य गुलाब खालकर महाराज (बीड), डॉ. गोरे डेंटल सुपर स्पेशालिटीतर्फे रविवारी (ता. ३१) सकाळी दहा वाजता मोफत दंत तपासणी व औषधोपचार शिबीर होईल. वैजीनाथ जगदाळे महाराज (बाश्रीकर), बुधराणी हॉस्पिटल पुणे फिनिक्स फाउंडेशनतर्फे सोमवारी (ता. १) मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रकिया शिबीर होईल.
|










