जिल्हा बँकेच्या उक्कलगाव शाखेत तिजोरी कापून साडेआठ लाखाची चोरी श्रीरामपूर :अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उक्कलगाव येथील शाखा ...
जिल्हा बँकेच्या उक्कलगाव शाखेत तिजोरी कापून साडेआठ लाखाची चोरी
श्रीरामपूर :अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उक्कलगाव येथील शाखा फोडून चोरट्यांनी तिजोरीतील ८ लाख ३८ हजार २५६ रुपयांची रोकड चोरून नेली. तिजोरी फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केलेला आहे. चोरटे सिलेंडर तेथेच टाकून गॅसची टाकी सोबत घेऊन पसार झाले. या घटनेने आशिया खंडात नाव असलेल्या जिल्हा बँकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे.










