नळजोड कामगारांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान; अहमदनगर;सगळे जन्मजात प्लंबर, आयुष्याची सुरुवातच प्लंबरच्या कामाने झाली. पण त्यांना प्लंब...
|
नळजोड कामगारांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान;
अहमदनगर;सगळे जन्मजात प्लंबर, आयुष्याची सुरुवातच प्लंबरच्या कामाने झाली. पण त्यांना प्लंबर म्हणून अधिकृत ओळख आणि मान्यता मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत. कें्रद्र सरकारचे प्रमाणपत्र आणि स्कील कार्ड मिळाल्यानंतरचा या प्लंबर्सच्या चेहर्यावरचा आनंद पाहण्याजोगाच होता. शहरातील ११५ प्लंबर्सना उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि सुधीर मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण मार्केटयार्डातील द टेक हब या संस्थेत झाले.
सुवेंद्र गांधी म्हणाले, पंतप्रधानांची ही योजना अतिशय महत्वाची आहे. कौशल्य विकास अंतर्गत प्रमाणपत्र असणार्या असंघटीत असुरक्षित छोट्या व्यवसायिकांना आता स्वत:ची ओळख निर्माण झाली आहे. पंतप्रधान यांच्या सर्वच योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आणि गरजूंना त्याचा फायदा होण्यासाठी प्रय▪करणार असल्याचे उपमहापौर छिंदम यांनी सांगितले. द टेक हबचे संचालक देवांग कुरवा आणि किरण गुंड यांच्या उपमहापौर छिंदम आणि सुवेंद्र गांधी यांनी या मोफत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र कार्यक्रमाबद्दल सत्कार केला.
|










