ग्रामपंचायत कर्मचार्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा अहमदनगर ; ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचार्...
ग्रामपंचायत कर्मचार्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा
अहमदनगर ;

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या किमान वेतन, राहणीमान भत्ता व विविध प्रलंबीत मागण्यांसाठी जिल्हा परिषद व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणून प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनात अध्यक्ष अँड़सुभाष लांडे, जिल्हा सचिव अँड़ सुधीर टोकेकर, कार्याध्यक्ष संदीप आल्हाट, कॉ.शंकर न्यालपेल्ली, मारुती वसंत, संजय डमाळ, प्रशांत उपाध्ये, रमेश तांबे, प्रभाकर शेंडगे, सुनिल शिंदे, अंबीर तांबोली, निसार शेख, महादेव शेळके आदिसह ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









