पक्ष संघटन वाढविण्यासाठी पदाधिकार्यांनी कामाला लागावे नगरपंचायतीला वशिलेबाजी खपणार नाही : वळसे पाटील अहमदनगर :जिह्यात येऊ घातलेल्य...
पक्ष संघटन वाढविण्यासाठी पदाधिकार्यांनी कामाला लागावे
नगरपंचायतीला वशिलेबाजी खपणार नाही : वळसे पाटील
अहमदनगर :जिह्यात येऊ घातलेल्या नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा. सक्षम आणि कार्यकर्त्यांची कामे करणार्यांना पक्ष संधी देईल. तिकिटासाठी वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ तथा प्रदेश निरीक्षक दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा व त्यानंतर तालुकानिहाय आढावा बैठक त्यांनी घेतली.
वळसे पाटील म्हणाले, युती सरकारचे ध्येय-धोरण निश्चित नाहीत. हिटरशाहीपद्धतीने कारभार सुरू आहे. त्यातून नेत्यांच्या चौकशा लावण्याचे प्रकार होत आहेत. याला त्यांच्या पक्षातील नेते देखील बळी पडले आहे. त्यामुळे अस्थिरपणा आणि ध्येय-धोरणांचा अभाव अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांची व पदाधिकार्यांची मोठी फळी आहे. जिल्ह्यात येऊ घातलेल्या नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. यावेळी सक्षम आणि सर्वसामान्यांची कामे करणार्यांना संधी मिळणार आहे. तिकिटांमध्ये वशिलेबाजी खपवून घेतली जाणार, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नेते पांडुरंग अभंग यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी पक्ष संघटनेचा जिल्हा आढावा घेत तालुकानिहाय बैठीका दर महिन्याला घेतल्या जातील, असे सांगितले. संग्राम कोते यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी युवक संघटनेची माहिती दिली. सुजित झावरे यांनी पारनेरला नगर तालुक्यातील जोडण्यात आलेल्या दोन गटात निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली. मंत्री महादेव जानकर यांनी अजित पवार यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दाचा ठराव मेळाव्यात झाला. मागील दाराने आलेल्यांनी मंत्रीपद मिळवून अशी भाषा वापरणे योग्य नाही, असे मत यावेळी मेळाव्यातून व्यक्त झाले. शिवाजीराव गाडे यांनी राहुरी येथील तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत कॉंग्रेस पूर्ण ताकदीने उतरली होती. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे कुठेच मदतीला आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची खंत व्यक्त केली. वळसे पाटील यांनी या तक्रारीच तत्काळ दखल घेतली जाईल, अशी ग्वाही यावेळी गाडे यांनाआमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजुषा गुंड, आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, विठ्ठल लंघे, सीताराम गायकर, प्रतापराव ढाकणे, कपिल पवार, सिद्धार्थ मुरकुटे, राजेंद्र फालके, अशोक सावंत, माधुरी लोंढे, रेश्मा आठरे, निर्मला मालपाणी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते










