Archive Pages Design$type=blogging

पंकजांचा रोष टाळण्यासाठी राम शिंदे सावध

पंकजांचा रोष टाळण्यासाठी राम शिंदे सावध  मुंबई : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खाते काढून घेतल्या...

पंकजांचा रोष टाळण्यासाठी राम शिंदे सावध 
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खाते काढून घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीमधील गटबाजी उफाळून आल्यामुळे नवे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी अद्यापि आपल्या मंत्रीपदाचा कार्यभारच स्वीकारलेला नाही. पंकजा मुंडे परदेशातून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ते कार्यभार स्वीकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण व रोजगार हमी योजना ही खाती काढली. ही खाती कमी करायच्या वेळेस त्यांनी पंकजा मुंडे यांना त्याबाबतची कल्पना दिली नव्हती. त्या वेळी त्या परदेशात होत्या. सिंगापूर येथे एका पाणी परिषदेलाही त्या उपस्थित राहणार होत्या. जलयुक्त शिवार कार्यक्रम राबवताना 'हे आपले पॅशन आहे,' असे ठासून सांगणार्‍या पंकजा मुंडे यांनी आपल्याकडून जलसंधारण खाते काढून घेतल्याचे कळताच उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. आपल्याकडे हे खाते राहिले नसल्याने आपण या पाणी परिषदेला जाऊ शकत नाही, असे पंकजा यांनी ट्विटरवरून जाहीर केले. परदेशवारीवर निघालेल्या मुख्यमंत्र्यांना ही माहिती मिळताच त्यांनीही ट्विटरवरूनच पंकजा मुंडे यांना खडसावले. एक ज्येष्ठ मंत्री या नात्याने आपण या परिषदेला उपस्थित राहून महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याच वेळी अहमदनगरमध्ये पाथर्डी तसेच मराठवाड्यात पंकजा मुंडे यांच्या सर्मथकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुतळेही जाळले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर पुन्हा एक संदेश जारी करत जलसंधारण व रोहयो खाती काढल्यामुळे आपण अजिबात नाराज नसल्याचे स्पष्ट केले. राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खाते दिल्याबद्दल आपल्याला आनंदच झाल्याचे त्यांनी यात म्हटले.

पंकजा मुंडे यांनी असे स्पष्टीकरण केले असले तरी गोपीनाथ मुंडे यांच्या गटातले निष्ठावंत समजले जाणारे राम शिंदे यांना कोणताही धोका पत्करायचा नाही. राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रीपदावर बढती मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार अद्यापि स्वीकारलेला नाही. पंकजा मुंडे अजून मायदेशी परतलेल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारून पंकजा मुंडे यांचा रोष पत्करायचा नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला असल्याचे कळते. दोन दिवसांनंतर पंकजा मुंडे मुंबईत येत आहेत. त्या परतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून मगच शिंदे त्यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे सूत्रांनी सांगितले. पंकजा मुंडे येईपर्यंत ते त्या विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करू शकत होते; पण सध्या ते यापासूनही दूर राहिले आहेत, असे कळते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पंकजांचा रोष टाळण्यासाठी राम शिंदे सावध
पंकजांचा रोष टाळण्यासाठी राम शिंदे सावध
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg0xY8mFbGizHcdBH1y0U5ILr-TYbzi__Ro0Mn0hE1CNNfgXHDyJnb4EFjq1BcaMpJxi9-w2HqAUgAAYC4j47CMtTcK0iUkJgg_Hd2zJM7Y6c7QIdDPW0frwIKaH-3KdZ8OvpGUPL-roXsD/s1600/Ram-Shinde-Pankaja-Munde-238x134.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg0xY8mFbGizHcdBH1y0U5ILr-TYbzi__Ro0Mn0hE1CNNfgXHDyJnb4EFjq1BcaMpJxi9-w2HqAUgAAYC4j47CMtTcK0iUkJgg_Hd2zJM7Y6c7QIdDPW0frwIKaH-3KdZ8OvpGUPL-roXsD/s72-c/Ram-Shinde-Pankaja-Munde-238x134.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_59.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_59.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago