नगर शहरातील परिस्थिती : पाणी साचत असल्याने शहरातील चौकाचौकांना येते तलावाचे रुप; गटारी अतिक्रमणात, पावसाचे पाणी रस्त्यावर ...
नगर शहरातील परिस्थिती : पाणी साचत असल्याने शहरातील चौकाचौकांना येते तलावाचे रुप;
गटारी अतिक्रमणात, पावसाचे पाणी रस्त्यावर
![]()
त्यातून अपघात वाढत आहे. महापालिका प्रशासनाने रस्ते आणि त्यालगतच्या गटारींवर योग्य, तांत्रिकपद्धतीने काम करावी, अशी अपेक्षा नगरकरांकडून व्यक्त होत आहे.डांबर आणि पाणी हे एकमेकांचे शत्रू आहे. त्यामुळे डांबरी रस्त्याची बांधणी करताना त्यावर पाणी साचणार नाही आणि त्याचा विसर्ग तत्काळ होईल, अशी तंत्रशुद्धपद्धतीने मांडणी केली पाहिजे. त्यासाठी रस्ता बांधणीचे चांगले निरीक्षण झाले पाहिजे. महापालिकेकडून त्याची गुणवत्ता योग्य आहे की नाही त्याची तपासणी केली पाहिजे. पण महापालिकेकडे तांत्रिक ज्ञान असलेल्या मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे शहरातील कितीही चांगल्या रस्त्यांचे काम झाले आणि त्यावर लाखो रुपये खर्च केले तरी ते पावसाळ्य़ात वाहून जाणार. शहरात होणार्या प्रत्येक रस्त्याची गुणवत्ता तपासली गेली पाहिजे. पण त्यासाठी पाहिजे, असलेली इच्छाशक्ती महापालिका प्रशासनाकडे नसल्याचे दिसते आहे.
- अभियंता विनोद काकडेमान्सूनने यावर्षी चांगलीच हजेरी लावली आहे. नगर जिल्ह्यात सध्या सर्वदूर पाऊस आहे. शहरात देखील थांबून-थांबून पाऊस होत आहे. गेल्या काही दिवसांत तर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरून पावसाचे पाणी चांगलेच वाहताना दिसत आहे. पण याच पाण्याचा विसर्ग गटारीतून झाला पाहिजे, अशी नगरकरांची अपेक्षा आहे. पण नगर शहर त्याला नेहमीच अपवाद ठरते.
|










