जनकल्याण रक्तपेढीच्या जागेचा प्रश्न सोडवू : कदम अहमदनगर ; जनकल्याण रक्तपेढी अत्यंत सेवाभावी वृत्तीने रक्तदान चळवळीमध्ये काम करत आह...
जनकल्याण रक्तपेढीच्या जागेचा प्रश्न सोडवू : कदम
अहमदनगर ;

जनकल्याण रक्तपेढी अत्यंत सेवाभावी वृत्तीने रक्तदान चळवळीमध्ये काम करत आहे. अनेक हजारो रुग्णांचे प्राण वाचविणारी ही जीवनदायी रक्तपेढी आहे. महानगरपालिकेने कराराने दिलेली ही जागा कायमस्वरुपी रक्तपेढीस देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तातडीने निर्णय घेऊन सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
नालेगाव येथील रक्तपेढीच्या कार्यालयास महापौर कदम व उपमहापौर छिंदम यांनी भेट दिली. त्यांचा रक्तपेढीचे कार्यवाह डॉ.दिलीप धनेश्वर, संचालक प्रमोद मुळे यांनी महापौर उपमहापौरांचा सत्कार आला. यावेळी त्या बोलत होत्या.
रक्तपेढीच्या कार्याची माहिती घेवून रक्तपेढीत असलेल्या अद्ययावत मशिनरी मार्फत चालवलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ.दिलीप धनेश्वर यांनी १८ वर्षापूर्वी नगरपालिकेने रक्तपेढीला नालेगाव येथील दिलेली ही जागा कायम स्वरुपी रक्तपेढीला मिळावी, यासाठी महापौरांनी कारवाई करावी अशी विनंती केली.
या कार्यक्रमास भाजपाचे गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक बाबासाहेब वाकळे, सुनीता मुदगल, जनकल्याण रक्तपेढीचे संचालक एस.व्ही.शाह, मिलिंद गंधे, डॉ.गौरी जोशी, डॉ.विलास मढीकर, प्रकाश स्मार्त, गजेंद्र सोनवणो उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश स्मार्त यांनी केले तर आभार डॉ.विलास मढीकर यांनी मानले.









