पालक मेळाव्यात शालेय वस्तूंचे वाटप टाकळी काझी येथील द रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलने आयोजित केलेल्या पालक मेळाव्यात शालेय वस्तूंचे वाटप ...
पालक मेळाव्यात शालेय वस्तूंचे वाटप
टाकळी काझी येथील द रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलने आयोजित केलेल्या पालक मेळाव्यात शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. येथे प्री प्राईमरीचे नर्सरी, एल.के.जी, हे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणीक गरज लक्षात घेऊन अविनाश पवार व प्रा. नवनाथ कराळे यांनी टाकळी काझी येथे श्री साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेअंतर्गत इंग्लिश स्कूल स्थापन केले आहे. खेड्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मातृभाषेव्यतिरिक्त इंग्रजी भाषा अवगत करावी तसेच शिक्षणासाठी शहराकडे होणारे स्थलांतर रोखणो हा या मागचा उद्देश असून त्यासाठी खालच्या स्तरापासून सुरुवात होणो गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना परवडण्यासाठी सर्व शालेय वस्तू मोफत देण्यात आल्या. शाळेला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असून मनोरंजनातून शिक्षण देणारी दज्रेदार इंग्रजी शाळा ग्रामीण भागासाठी सुरु केल्याचे संचालकांनी सांगितले. याप्रसंगी शाळेच्या आवारात पालकांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शंकरराव ढगे, संजय ढगे, प्रिन्सिपल श्रीमती इंगोले, सर्व महिला शिक्षक व पालक उपस्थित होते.