भगवंताच्या व गुरूंच्या पाठबळामुळे कोणतेही असाध्य काम साध्य : महापौर सुरेखा कदम अहमदनगर ; भगवंताच्या आशीर्वादाने व गुरुंच्या पाठबळामुळे कोणत...
भगवंताच्या व गुरूंच्या पाठबळामुळे कोणतेही
असाध्य काम साध्य : महापौर सुरेखा कदम
अहमदनगर ;

भगवंताच्या आशीर्वादाने व गुरुंच्या पाठबळामुळे कोणतेही असाध्य काम साध्य करता येते. आजच्या देवी मंदिरातील गुरुपुजनाच्या कार्यक्रमानिमित्त दुर्गामातेला शहराच्या विकासासाठी मला शक्ती देण्याची मागणी केली आहे. असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
सावेडी येथील ओंकार कॉलनीमधील दुर्गामाता मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सर्मथ सत्संग परिवारातर्फे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, शहरातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी व अडचणी दूर करण्यासाठी गुरुचरणी आशीर्वाद मागितले आहेत. नागरिकांच्या पाठबळावर व सहकार्याने नगर शहराच्या विकासासाठी प्राधान्याने प्रय▪ सुरु केले असल्याचेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात सद्गुरु, अनुग्रह, संप्रदाय या विषयावर प्रवचन करताना सज्जनगड येथील सर्मथभक्त मंदारबुवा रामदासी यांनी सद्गुरु प्राप्तीसाठी सर्वप्रथम सद्शिष्य होणो आवश्यक आहे. जेव्हा सद्गुरु व सद्शिष्य यांचा मेळ होतो, तेव्हा अनुग्रह होतो. नुसती तुळशीची माळ गळ्यात घातली म्हणून अनुग्रह होत नसतो. मात्र एखादच शिष्य असतो, की ज्याच्या मस्तकी गुरुचा हात असतो. नाममंत्र, ध्यान व गुरुग्रंथाच्या तत्वज्ञानाचा बोध हे सद्गुरुंचे वचन असल्याचे त्यांनी प्रवचना दरम्यान सांगितले. महापौर कदम यांच्या हस्ते सर्मथभक्त भास्करबुवा रामदासी यांच्या पादुकाच्या पुजनाने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी नगरसेविका विणा बोजा, उद्योजक श्रीनिवास बोज्जा, हभप डॉ.सी.बी.कुलकर्णी आदिंसह भाविक उपस्थित होते.
यावेळी दुर्गामाता मंदिर ट्रस्टच्यावतीने महापौर सुरेखा कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराचे ट्रस्टी श्रीमती थोरवे, हर्षद भावे, रवि पिसोरे, हिराकांत रामदासी, डॉ.अनिकेत घोटणकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा होशिंग यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात तैय्यब शेख व प्रसन्न पाठक यांचे भक्तीगित गायन झाले.









