/ प्रतिनिधी -
प्रापंचिक जीवनातील मोह, माया यांचा पडदा जीवनातून हटविल्याशिवाय आपल्याला गुरूचे ज्ञान होणार नाही. मनुष्य जन्मात मोक्ष प्राप्ती मिळविण्यासाठी प्रत्येकाने सद्गुरू करा. सद्गुरूची शरणागती स्वीकारण्यातच जीवनाचे सार्थक आहे, असे प्रतिपादन प.पू. बालयोगी महाराज यांनी केले. आषाढी गुरुपौर्णिमेनिमित्त शेवगाव तालुक्यातील ताजनापूर येथील दत्त आश्रमात झालेल्या कीर्तनात आश्रमाचे प्रमुख प.पू. बालयोगी महाराज बोलत होते. बालयोगी महाराज यांनी, संपत्ती सोहळा न आवडे मनाला, जावे पंढरीशी आवडे मनासी, तुका म्हणो ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे, या अभंगाचे निरुपन करताना महाराज म्हणाले, जो दिसत नाही, तो भगवान परमात्मा हा सत्य आहे. इतर दिसणार्या वस्तू या नाशवंत आहेत. जन्माला आलेल्या मनुष्याच्या प्रारब्धाची गती ही पूर्वजन्मीच्या कर्मानुसार होते. त्यामुळे, जीवनात संतसंगती व कर्माला सर्वाधिक महत्व असून, त्यासाठी सद्गुरू असावा लागतो. याप्रसंगी कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भोसले, हभप उत्तमराव आर्ले, मृदंगाचार्य संग्राम शिंदे, दत्तू लोढे, रावसाहेब ढाकणो, डॉ. राजू जहागिरदार, विष्णू लंगोटे, अज़रुन वीर, दिलीप सावंत, सीताराम क्षीरसागर, भाऊसाहेब आहेर, ज्ञानेश्वर माऊली व्यवहारे, ज्ञानेश्वरचे संचालक शिवाजीराव मोरे, भाऊसाहेब शेळके, सुनील हाडके, परशुराम नजन साहेब, अमरापूरचे सरपंच विजयराव पोटफोडे, अरुण पवार, शंकरराव लंगोटे, प्रभाकर नजन, डॉ. फारूक जहागिरदार, संदीप काळे, ज्ञानेश्वर माऊली खरात, राम महाराज काळे, गंगाधर नजन, सुधाकर नजन, लक्ष्मण नजन, नानासाहेब बर्डे, नवृत्ती वीर, साहेबराव कोल्हे, नामदेव नजन, प्रा. कारभारी नजन, राहुल नजन, व नवनाथ चौधरी, महादेव राजगुरू, बळीराम व्यवहारे, दत्तू रोडगे, सखाराम नजन, अमोल मुळे, बाळासाहेब नजन, तुषार तुतारे, राम पा. लांडे, अशोक मैंदळ ,मोहनराव कौंसे, शंकर रोडगे , बापूसाहेब नजन, दादा पाटील बर्डे आदींसह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. महाप्रसादाची पंगत शिवाजी सोलाट, साहेबराव कोल्हे, शहादेव लंगोटे, महादेव लंगोटे, अशोक नजन आदींच्यातर्फे देण्यात आली.
|