वृक्षारोपणाने बागल पंडगू सण साजरा प्रदूषणाला वृक्षांच्या माध्यमातूनच आळा; सुरेखा कदम व वृक्षमित्र शंकरराव मुत्याल यांच्या हस्त...
वृक्षारोपणाने बागल पंडगू सण साजरा
प्रदूषणाला वृक्षांच्या माध्यमातूनच आळा;

सुरेखा कदम व वृक्षमित्र शंकरराव मुत्याल यांच्या हस्ते विविध वनौषधींची झाडे लावण्यात आली. यावेळी उद्योजक श्रीनिवास बोज्जा, सुरेश बोज्जा, शशिकला बोज्जा, सचिन छाजेड, अजय कोडम, सागर कुंदर, विष्णू जक्कन, बालाजी नंदन, मनपा उद्यान विभागाचे उद्धव म्हसे, मधु बोका आदिंसह परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना महापौर कदम म्हणाल्या, बागल पंडगु सणानिमित्त अत्यंत स्त्युत्य उपक्रम आज राबविण्यात आला आहे. या वृक्षारोपणाच्या उपक्रमामुळे हा परिसर अत्यंत सुशोभित होणार आहे. महापालिकेच्यावतीने या परिसरात मुलभुत सोईसुविधा, रस्ते, पथदिवे, उपलब्ध करुन देण्यासाठी प्रय▪करु, असे सांगितले. प्रास्तविकात श्रीनिवास बोज्जा म्हणाले, पद्मशाली समाजाचा बागल पंडगुहा सण बागेत जाऊन साजरा करण्याचा दिवस असतो. मात्र या दिवशी मद्य व मासांहार घेण्यास प्राधान्य दिले जाते. यासर्व गोष्टींना फाटा देत खर्या अर्थाने आपल्या परिसराला बागेचे स्वरुप यावे, यासाठी बागल पंडगु सणानिमित्त वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात.
उद्याच्या निरोगी व सुदृढ जीवन जगण्यासाठी आजच सर्वांनी वृक्षारोपण व वृक्षाचे संवर्धन करणो आवश्यक आहे. आज मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रदुषण वाढले आहे. या प्रदुषणाला वृक्षांच्या माध्यमातूनच आळा बसू शकतो. त्यामुळे जीवनामध्ये प्रत्येकाने एकतरी झाड लावून ते लहान मुलांप्रमाणो सांभाळून वाढविले पाहिजे, असे प्रतिपादन पुण्याचे वृक्षमित्र शंकरराव मुत्याल यांनी केले.
पद्मशाली समाजाच्या बागल पंडगू सणाचे औचित्य साधून भिस्तबाग महल परिसरातील तुळजाभवानी नगर येथील देवकृपा कॉलनीत नगरसेविका विणा बोज्जा यांच्या पुढाकाराने औषधी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.









