महासभेचे इतवृत्त व ठराव सादर करा उच्च न्यायालयाचे प्रशासनास आदेश; अहमदनगर; महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीसाठी दि. २0 जुल...
महासभेचे इतवृत्त व ठराव सादर करा
उच्च न्यायालयाचे प्रशासनास आदेश;
अहमदनगर;

महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीसाठी दि. २0 जुलै रोजी झालेल्या महासभेचे इतवृत्त व ठराव ८ दिवसांत सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने महापालिका प्रशासनास दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
महापालिकेच्या आठ नवृत्त झालेल्या सदस्यांची रिक्त जागा भरुन काढण्यासाठी दि. २0 जुलै रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरुन या सभेत प्रचंड गोंधळ उडाला होता. या गोंधळातच ८ सदस्यांची नियुक्ती पीठासन अधिकारी तथा महापौर सौ.सुरेखा कदम यांनी केली होती. या सदस्य निवडीस विरोधकांनी आक्षेप घेतला होता. याबाबत उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आ. संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी आघाडीचे १५ व काँग्रेसचे ७ अशा २२ नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेत महापालिका आयुक्त नगरसचिव, महापौर व नवनियुक्त ८ स्थायी सदस्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर सोमवार, दि. २५ रोजी न्या.आर.एम.बोर्डे व न्या.के. एल वडणे यांच्यासमोर महासभेचे इतवृत्त व ठराव ८ दिवसांत न्यायालयात सादर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनास देण्यात आले आहेत. या प्रकरणात महापालिकेतर्फे व्ही.एस.बेद्रे,आर.आर.मंत्री, दिलीप सातपुते यांच्या तर्फे आर.एम.धोर्डे, सचिन जाधव यांच्यावतीने मुकुल कुलकर्णी आदी काम पहात आहेत. तर ही याचिका औरंगाबाद खंडपीठात ज्येष्ठ विधीज्ञ पी.एम. शाह व गिरीष थिगळे यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे









