कर्जत तालुक्यातील घटना, आरोपीस अटक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून कर्जत- तालुक्यातील कोपर्डी येथे काल (दि.१३) रात्री एका नराधम...
|
कर्जत तालुक्यातील घटना, आरोपीस अटक
|
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून
|
कर्जत- तालुक्यातील कोपर्डी येथे काल (दि.१३) रात्री एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्याची घटना घडली. या घटनेचे तीव्र पडसाद आज तालुक्यात उमटले. लोकांनी व्यवहार बंद ठेवून या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकेची मागणी केली. आरोपीस श्रीगोंदा येथे अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी दिली. याबाबत कर्जत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- तालुक्यातील कोपर्डी येथीलएक अल्पवयीन मुलगी आपल्या आजोबाकडे मसाला आणण्यासाठी गेली होती. ती परत येत असताना आरोपी पप्पू शिंदे याने तिचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केले. तसेच ही घटना इतरांना सांगू नये म्हणून आरोपीने या मुलीचा गळा दाबून खून केला. याबाबत शिवराम गोरख सुद्रिक यांनी फिर्याद दिली आहे. सकाळी या मुलीचा मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असता, संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या वेळी संतप्त युवकांनी शहरातील दुकाने बंद करून छ. शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.