केलेल्या चुकांवर पांघरून घालणो म्हणजे संस्कार नव्हे : इंदोरीकर अहमदनगर; मुलांवर आई-वडिलांनी चांगले संस्कार करावेत, म्हणजे पुढे त...
केलेल्या चुकांवर पांघरून घालणो म्हणजे संस्कार नव्हे : इंदोरीकर
अहमदनगर;
![]()
मुलांवर आई-वडिलांनी चांगले संस्कार करावेत, म्हणजे पुढे तो घराचे, शहराचे व देशाचे नाव उज्वल करेल. आणि अशा संस्कारक्षम मुलांमुळे भविष्यात चांगला समाज घडेल. आज संस्कारक्षम पिढी अभावी मुलांमध्ये एकटेपणा, व्यसनाधिनता वाढतांना दिसत आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना येणार्या अडचणीतून मार्ग काढला पाहिजे. अनावश्यक हट्ट पुरविणो, केलेल्या चुकांवर पांघरुन घालणो म्हणजे संस्कार नव्हे. कारण पुढे चालून याच गोष्टी सर्वांसाठी घातक ठरु शकतात. केवळ पैसा, संपत्ती ही महत्त्वाची नसून, संस्कार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आजच मुलांवर चांगले संस्कार करा, असे प्रतिपादन प्रबोधनकार हभप इंदोरीकर महाराज यांनी केले.
माळीवाडा येथील सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात हभप इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, विश्वनाथ राऊत, छबुनाना जाधव, बाबासाहेब सुडके, लक्ष्मण पडोळे, सुभाष सांगळे, दिलीप आरडे, अनिल फुलसौंदर उपस्थित होते.
इंदोरीकर महाराज म्हणाले, ज्या दिवशी वृद्धाश्रम बंद होतील.त्या दिवशी भारत सुखी होईल. मुलांना त्यांच्या मर्जीप्रमाणो वागू द्या, उगाच एखाद्याची बरोबरी करू नका, त्याची गुणवत्ता तपासा, जी माणसे स्वत:साठी जगतात, ती स्वार्थी असतात. दुसर्यासाठी जगतात ती निस्वार्थी असतात.
पश्चात्य देशाची संस्कृती ही आपल्या देशाला घातक ठरू शकते. त्यामुळे भारतीय संस्कृती ही सर्वात चांगली संस्कृती आहे. केवळ टाईमपास होत नाही, म्हणून कीर्तनाला येवून बसू नका, तर त्यातून मिळणार्या ज्ञानाचे आपल्या जीवनात आचरण करा. नाही तर कीर्तनाला यायचं आणि भलत्याच गप्पा मारायच्या आणि म्हणायचं कीर्तन 'लई भारी झालं'. जीवन हे सुंदर आहे, ते जगण्याचा प्रय▪करा, अध्यात्माने मनाला शांती मिळते, सुख मिळते. नाम स्मरणात मोठी ताकद आहे. तेव्हा देवाचे नामस्मरण करा, अशा वेगवेगळ्या प्रबोधात्मक गोष्टींतून इंदोरीकर महाराजांनी भाविकांना अध्यात्मातून प्रबोधन केले. यावेळी समितीच्यावतीने इंदोरीकर महाराजांचा सन्मान करण्यात आला.
हा सप्ताह यशस्वीतेसाठी माणिकराव बनकर, सोमनाथ गाडळकर, कैलास खरपुडे, बाबासाहेब जाधव, अशोक जाधव, विशाल पटवेकर, सोमनाथ रोकडे,कैलास मोकाटे, सतीश डागवाले, ज्ञानेश्वर घटमाळ, नितीन शेरकर, बाबासाहेब पटवेकर, कैलास सुडके, रमेश चौधरी, मूलचंद नरसल, दत्तात्रय पटवेकर, सुनील राऊत, विनायक आंबेकर, बाळासाहेब पुंड, राहुल फुलसौंदर आदिंसह हभप दत्ता महाराज जाधव प्रयत्नशील आहेत. तुडंब भरलेल्या भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता. कीर्तनात महिला, भाविक अबालवृद्ध रंगून गेले होते.
|










