पुण्यातील दोघा संशयितांना बसस्थानक परिसरात पकडले; अहमदनगर / प्पुण्यातील दोन संशयितांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पहाटेच्या सुमा...
पुण्यातील दोघा संशयितांना बसस्थानक परिसरात पकडले;
अहमदनगर / प्पुण्यातील दोन संशयितांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास माळीवाडा बसस्थानक परिसरात पकडले. दीपक प्रकाश बोर्हाटे (रा. हवेली, पुणे) व ज्ञानेश्वर कैलास विटेकर (रा. पुणे) अशी संशयितांची नावे आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, कोतवाली पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना त्यांना माळीवाडा बसस्थानकाच्या मागील बाजूस अंधारात भिंतीच्या आडोशाला संशयीतरित्या वावरणारा एक तरुण दिसला त्याला हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, तो चोरीच्या उद्देशाने फिरत असावा या संशयावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर स्वस्तीक चौकात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या आवारात आंधारात एकजण संशयितरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळून आला त्याच्याकडेही चौकशी करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी दीपक प्रकाश बोर्हाटे व ज्ञानेश्वर कैलास विटेकर (रा. पुणे) यांना ताब्यात घेतले असून मुंबई पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
|









