मुळा'च्या कालव्यांना आजपासून पाण्याचे आवर्तन; मुळा धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. पाण्याचा काटक ...
मुळा'च्या कालव्यांना आजपासून पाण्याचे आवर्तन;

मुळा धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. पाण्याचा काटक सरीने वापर व्हावा म्हणून जलसंपदा विभाग प्रयत्नशील आहे. पाण्याचा गैरवापर करणार्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांनी सहकार्य करावे.
-किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग राहुरी : मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांतून बुधवारी पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पाण्याचा गैरवापर होऊ नये म्हणून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, शेवगावचे तहसीलदार दादासाहेब गिते, नेवासेचे नामदेव टिळेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मुळा धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालवे यांनी बैठक घेवून पाणी सोडण्याचे निर्देश दिले.
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुका प्रशासनाने सुचविलेले पिण्याच्या पाण्याचे उद्भव या आवर्तनातून भरले जाणार आहेत. कालवा फोडून पाणी घेऊ नये किंवा आवर्तनाला अडथळा येऊ नये म्हणून महसूल विभाग व जलसंपदा विभाग संयुक्त कारवाई करणार आहेत.
मुळा कालव्यालगत असलेल्या गावांसाठी कलम लागू करण्यात आले आहे. अनधिकृत तलावात पाणी सोडले जाऊ नये, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे जलसंपदा सूत्रांनी सांगितले. मुळा धरणात सायंकाळी १४ हजार ७00 दशलक्ष घनफूट पाणीसाठय़ाची नोंद झाली. आवक १ हजार १६८ क्युसेकने सुरू आहे. लाभक्षेत्रावर मंगळवारी पावसाने हजेरी लावली









