सावेडीतील म्हस्के शाळेत शालेय साहित्याचे वाटप; अहमदनगर; सावेडीतील पार्वतीबाई म्हस्के प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक ...
सावेडीतील म्हस्के शाळेत
शालेय साहित्याचे वाटप;
![]()
अहमदनगर;
सावेडीतील पार्वतीबाई म्हस्के प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आहेर यांनी स्वखर्चातून क्रमिक पुस्तके, पेन्सिल, पेन, वह्या अशा शालेयपयोगी साहित्याचे वाटप केले. यानिमित्ताने शाळेत संस्थेचे सल्लागार प्रा. डॉ. रामकिसन सासवडे, प्रशांत आहेर यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. रोपांच्या संगोपनाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणून करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पठारे, शिक्षक डी. बी. झगडे, एस. व्ही. मेंढे, एच. आर. थोरात, जे. आर. सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
|










