विद्यार्थी वाहतूक करणार्या रिक्षा चालकांवर अन्याय होऊ देणार नाही : महापौर अहमदनगर - शिवसेना रिक्षा चालकांवर कदापी अन्याय ह...
विद्यार्थी वाहतूक करणार्या
रिक्षा चालकांवर अन्याय होऊ देणार नाही : महापौर
अहमदनगर -
![]()
शिवसेना रिक्षा चालकांवर कदापी अन्याय होवू देणार नाही. रिक्षाचालक संघटना व शिवसेना यांचे गेल्या २५ वर्षांपासून अतूट नाते आहे. त्यामुळे शाळा उघडल्या की रिक्षाचालकांवर पहिली कारवाई केली जाते, रिक्षाचालक हे विद्यार्थ्यांची जबाबदारीने ने-आण करतात. पालकांचाही रिक्षा चालकांवर मोठा विश्वास आहे. परंतु अशा प्रामाणिक रिक्षाचालकांवर नाहक कारवाई होणार असेल तर त्यांच्यामागे शिवसेना खंबीरपणे उभी राहील, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
शिवशालेय विद्यार्थी रिक्षा वाहतूक संघटनेच्यावतीने महापौर कदम यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना उपनेते अनिल राठोड, संघटनेचे अध्यक्ष चंदकांत चिलका, शिवाजी म्हस्के, दीपक वाघमारे , सलिम शेख, घनश्याम सापते, पप्पू शिंदे, सुरेश विघ्ने, लक्ष्मण खामकर, संजय दिंडे, राजू जरे, प्रकाश चारगुंडी, पांडुरंग जाधव, मच्छिंद्र फुलारी, श्याम गायकवाड, शेख गनी, अशोक मोरे, प्रदीप राऊळ, किशोर जव्हेरी, संजय कुंकलोळ, बाळू नवले, संतोष उगले, अशोक बिल्ला आदी. यावेळी उपनेते राठोड म्हणाले, भविष्यात शिवसेनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांसाठी विविध योजना सुरू करण्यात येतील. रिक्षाचालकांचे सुख:दु:ख हे आमचे सुख-दु:ख आहे. विद्यार्थी वाहतूक करणार्या रिक्षा नेहमी नियमांचे पालक करूनच शहरात वावरात असतात. शहरातील अरुंद रस्ते पाहता शालेय बस येवू श्कत नाही, त्यामुळे रिक्षांशिवाय पर्याय नाही, प्रत्येक अडचणीला श्विसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिल, असे त्यांनी आश्वासन दिले. कार्यकामाचे सूत्रसंचालन प्रकाश चारगुंडी यांनी केले तर आभार संतोष उगले यांनी मानले.
|










