पोलिसांची गस्त, तरीही तिसगावकर त्रस्त उपोषण करणार; ■ तपासाच्या विलंबाने याबाबतच्या जनभावना अधिकच तीव्र होऊन दोन वेळेस रस्ता र...
पोलिसांची गस्त,
तरीही तिसगावकर त्रस्त
■ तपासाच्या विलंबाने याबाबतच्या जनभावना अधिकच तीव्र होऊन दोन वेळेस रस्ता रोकोच्या घटना झाल्या तर आता ऑगस्टनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याच्याही हालचाली परिसरातील गावात आहेत. तिसगाव : गर्भगिरी डोंगर रांगाच्या कुशीतील पक्के रस्ते, खोलगट दर्या, घनदाट वनराई या निसर्ग अनुकूलतेत विजेचा लपंडाव, धार्मिक स्थळांवरील गर्दीचा वावर या पूरक बाबी चोरट्यांच्या सर्वांगीण वावरासाठी अनुकूल ठरत असल्याने श्रीक्षेत्र मढी, धामणगाव, वृद्धेश्वर, शिरापूर, देवराई, निवडुंगे, करडवाडी, पाणतासवाडी गावातील रहिवाशांची पंधरा दिवसांपासून झोपच उडाली आहे.
रात्रभर पोलिसांची गस्त असूनही नागरिक त्रस्त झाले आहेत. सायरन वाजवीत जाणारी पोलीस गाडी दूरवर गेल्याचा सुगावा लागताच दुसर्या वस्तीवर हल्ला होण्याची क्रिया घडते. भ्रमणध्वनीवरच्या ठिकाणाची माहिती दुसरीकडे होऊन चैतन्य कानिफनाथ गडाच्या ध्वनीक्षेपकांवरून ती सर्वदूर पोहोचते.
पोलीस व मदतीसाठी शेजारी येईपर्यंत सर्व पसार असा पाठ शिवणीचा रातभराचा थरार भितीत भर घालीत आहे.
मढी, निवडुंगेच्या फुलोरबाग परिसरात प्रदीप मरकड चोरट्यांच्या हल्ल्यात मृत झाला. देवराईचे ग्रामदैवत बालाजी मंदिराची दानपेटी फुटली. अशा पोलिसांच्या कार्यक्षमतेला आव्हान देणार्या घटना घडल्याच्या भितीने सूर्यास्तानंतर रस्ते निर्मनुष्य होत आहेत.
फळबागांच्या निमित्ताने दूर डोंगरदर्यातील शेती वस्त्यांचा रहिवाशीही पुन्हा सुरक्षेसाठी गाव कुसाच्या वस्तीला आले. अनोळखी फेरीवाले, खारी, पाव, संसार उपयोगी भांडे, साड्या विक्रेते यांच्याकडून खरेदीसाठीही अलीकडील काळात नागरिक संशयानेच पहातात










