Archive Pages Design$type=blogging

आंबेडकर भवनाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार

आंबेडकर भवनाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार मुंबई : डॉ. आंबेडकर भवन पाडल्यानंतर दोषींवर राज्य सरकार आणि पोलिसांकडून कारवाई होईल, असा आम्हा...

आंबेडकर भवनाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार
मुंबई : डॉ. आंबेडकर भवन पाडल्यानंतर दोषींवर राज्य सरकार आणि पोलिसांकडून कारवाई होईल, असा आम्हाला विश्‍वास होता; परंतु तसे घडले नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, त्यामध्ये या विषयाची दखल घेतली जाईल, असे शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी म्हटले. आंबेडकर कुटुंबीयांवर होणारे आरोपदेखील येग्य नाहीत, असेही त्यांनी या वेळी म्हटले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनला मुंबई महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना प्रवक्ता आ. डॉ. नीलम गोर्‍हे, गटनेत्या तृष्णा विश्‍वासराव व स्थानिक नगरसेविका अलका डोके तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी यांच्यासह भेट दिली. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचे भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे, 
महेश भारतीय व अनेक आंबेडकरी संघटनातील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी डॉ. गोर्‍हे म्हणाल्या की, वास्तूच्या भिंतींसोबतच प्रेसमधील जुनी व नवी मशीन तोडण्यात आली आहे. 
एकूणच केलेल्या तोडफोडीमुळे आंबेडकरांच्या वापरातील जुने फर्निचर व सामान याची धूळधाण झाली आहे. बाबासाहेबांच्या प्रेस व त्यातील वस्तूंची जी काळजी घ्यायलाच हवी होती त्याबाबत अक्षम्य हेळसांड झाली आहे. मुंबई मनपाच्या नियमानुसार इमारतीतील भाडेकरू व कब्जेदार या सर्वांना पर्यायी जागा द्याव्या लागतात. वीज, पाणी खंडित करावे लागते, जमीनदोस्त करण्याचा आराखडा व त्याचे टप्पे त्याना 
लागतात तसेच मनपा अधिकार्‍याच्या देखरेखीखाली हे काम केले जाते. हे सर्व नियमांचे इप्रुव्हमेंट ट्रस्टच्या प्रतिनिधींनी उल्लंघन केले आहे. याबाबत तक्रारी नोंदवूनही पोलिसांनी त्वरित कारवाई केली नाही. याबाबतही कोर्टात पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे. १७ मजली टॅावर बांधण्याचे आश्‍वासन देण्यात येत असले तरी मनपाची परवानगी किती मजल्यांची आहे, याबाबत तपासणी गरजेची आहे, असेही त्या या वेळी म्हणाल्या.
तोडगा निघेपर्यंत पुनर्बांधणीस स्थगिती देणार - महापौर
लंडन येथील स्मारकाची आपण देखरेख करतो, तर येथील प्रेसबाबत दुर्लक्ष करणे योग्य नाही. राज्य शासनाने याबाबत योग्य तो तोडगा काढेपर्यंत मनपा इमारतीच्या पुनर्बांधणीस स्थगिती देण्याचा विचार करेल. डिमॉलिशन अयोग्य प्रकारे करण्यात आले आहे, असेही महापौर स्नेहल आंबेकर यांनी म्हटले

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: आंबेडकर भवनाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार
आंबेडकर भवनाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjr7BKxF7br7U9WgCKLG_sdkBbqFSxUhkws2k_dmHvduK9rrbfodC3EdGhFzctzbM5AFJeYxKBMOZ1NUcX0C523I98PLXHX0eDBzsO18UavV-uMXwCFueHjdXyIU3NI3dciDeC10ahOHJwR/s1600/13072016-md-ah-5-4517-1-large.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjr7BKxF7br7U9WgCKLG_sdkBbqFSxUhkws2k_dmHvduK9rrbfodC3EdGhFzctzbM5AFJeYxKBMOZ1NUcX0C523I98PLXHX0eDBzsO18UavV-uMXwCFueHjdXyIU3NI3dciDeC10ahOHJwR/s72-c/13072016-md-ah-5-4517-1-large.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_75.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_75.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago