Archive Pages Design$type=blogging

सहकारातील ' हिरा' हरपला;

सहकारातील ' हिरा' हरपला ; सहकारमहर्षी, सॉलिसिटर तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच...


सहकारातील ' हिरा' हरपला;
सहकारमहर्षी, सॉलिसिटर तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय, पारनेर व मुंबईतील हजारो कुटुंबीयांचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे सॉलिसिटर गुलाबराव सखाराम शेळके यांचे मुंबईत मंगळवारी (दि. २६) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज (दि.२८) त्यांच्या पार्थिवावर पिंप्रीजलसेन (ता.पारनेर) या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. शेतमजुरी, शिपाई अन् थेट सॉलिसिटर असा त्यांच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. कै. गुलाबराव शेळके यांच्या निधनाने केवळ पारनेरवरच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यासह मुंबईकरांवर शोककळा पसरली आहे. कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा पाठीशी नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सहकार व राजकीय क्षेत्रात गरुडझेप घेतली. सहकार चळवळीचा विशेष करून बॅंकिंग क्षेत्रातील विकासाचा आलेख उंचावत ठेवत त्यांनी आपल्या कार्याचा आदर्श ठेवला आहे. सहकार, बॅंकिंग, वकीली व्यवसायाप्रमाणे लॅण्ड अँण्ड प्रॉपटी क्षेत्रातही ते तज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने सहकारातील चमकता हिराच हरपला आहे.अहमदनगरचा दक्षिण भाग तसा दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. दक्षिणेतील पारनेर तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या पिंप्री जलसेन या गावी सॉलिसिटर गुलाबराव सखाराम शेळके यांचा जन्म झाला. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याने गुलाबराव शेळके यांनी आपले आई-वडील अन् भावंडांसह शेतमजुरी केली. शेतमजुरीच्या माध्यमातून शेळके कुटुंबीय उदरनिर्वाह करीत असे. हलाखीची परिस्थिती असल्याने गुलाबराव शेळके यांचे ७ वी पर्यंतचे शालेय शिक्षण स्थानिक पातळीवरच झाले. तद्नंतर ध्येयाने पछाडलेल्या गुलाबराव शेळके यांनी १९५६ साली मुंबई गाठली. ग्रामीण भागातील अन् अत्यंत बेताची परिस्थिती असलेल्यांना जशी मुंबई गवसते, तशीच गुलाबराव शेळके यांनाही मुंबई पावली. काका-मावशीकडे वास्तव्याला राहून शेळके यांचा दिवसा शिपाई अन् रात्री शिक्षण असा दिनक्रम असायचा. कुठल्याही प्रकारच्या सुख-सुविधा नसताना 'शिका आणि कमवा' या तत्वाने त्यांनी १९६४ साली गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये एलएलबी पदवी मिळविली. तद्नंतर एल.एल.एम. व सॉलिसीटर ही उच्च पदवीही प्राप्त केली.
एकीकडे उच्च शिक्षण अन् दुसरीकडे गरिबीचे चटके शेळके यांनी सोसत आपला संघर्षमय जीवनप्रवास चालू ठेवला. त्यांना कर्जासाठी सावकार व बॅंकांची उंबरठे झिजवावे लागले. त्यातून आलेल्या कडव्या अनुभवातूनच बॅंक स्थापण्याचा पक्का इरादा त्यांनी केला. प्रचंड कष्ट सोसून शेळके यांनी महानगर बॅंकेची स्थापना केली. सुरुवातीला लावलेल्या महानगर बॅंकेच्या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. राज्यातील बहुतेक ठिकाणी महानगरच्या शाखा आज कार्यरत आहेत. शेळके यांच्या कठोर परिश्रमातूनच महानगर बॅंकेच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. शेळके यांनी हजारो सर्वसामान्य कुटुंबीयांना बॅंकेच्या माध्यमातून कर्ज तसेच शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने ते सर्वसामान्यांचे आधारवडच होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात असे. सहकार चळवळीतील अनेक विषयांवर ना.पवार व शेळके यांच्यात सकारात्मक सल्ला-मसलत व्हायची. पारनेरचे सुपुत्र कै.गुलाबराव शेळके यांनी मुंबईत येवून आपल्या कार्याचा ठसा उमटविल्याने त्यांचे ना.पवार यांनी तोंडभरुन कौतुक केले होते.
महानगर को-ऑप.बॅंकेप्रमाणेच महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुराही त्यांनी सर्मथपणे पार पाडली. सहकार क्षेत्राला विशेष करून बॅंकिंग क्षेत्रात सध्या 'बुरे दिन' असल्याचे बोलले जाते. मात्र काटकसर व स्वच्छ कारभार केल्यास बॅंकिंग क्षेत्रालाही 'अच्छे दिन' असल्याचे कै. गुलाबराव शेळके यांनी पोकळ गप्पा ठोकून नव्हे तर त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. कै.शेळके यांचा सहकारातील आदर्श वारसा त्यांचे सुपुत्र उदयराव शेळके सर्मथपणे पुढे नेत आहेत. जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी उदयराव शेळके यांनी पार पाडली. कै.गुलाबराव शेळके यांच्या पत्नी सुमनताई यांचेही मोठे योगदान असून, त्यांनी महानगर बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. कै.शेळके यांची थोरली कन्या मिनल नांदेडला रुग्णसेवा करत असून, धाकटी कन्या स्मिता पटेल विदेशात उच्च पदावर कार्यरत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गुलाबराव शेळके यांच्या कुटुंबीयांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले. जिद्द चिकाटी, प्रचंड कष्टाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हाच आदर्श त्यांनी समाजातील तरुणांसमोर ठेवला आहे. कै. शेळके यांच्या कार्याचा आदर्श निश्‍चितपणे घेण्यासारखा आहे

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: सहकारातील ' हिरा' हरपला;
सहकारातील ' हिरा' हरपला;
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuXKkcId0fWQJctzeSpMjl2-I9989A1znHlAYUK_7bY9bCL_ouiE-SmIr-iD_GTXS1Tz7Rb1lvEpH1HfFXiMJtrZn97LY2H2m23e8Aq8Hf0-_ZK34xXkHGF1CxQf1jv-M-uFRrkqB0sQrh/s200/Lss+news.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuXKkcId0fWQJctzeSpMjl2-I9989A1znHlAYUK_7bY9bCL_ouiE-SmIr-iD_GTXS1Tz7Rb1lvEpH1HfFXiMJtrZn97LY2H2m23e8Aq8Hf0-_ZK34xXkHGF1CxQf1jv-M-uFRrkqB0sQrh/s72-c/Lss+news.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_750.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_750.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago