शहर सहकारी बँकेची रूपे डेबिट कार्ड सेवा सुरू; अहमदनगर ; येथील अहमदनगर शहर सहकारी बॅंकेने आधुनिक बँकिंगच्यादृष्टीने दि. १९ जुल...
शहर सहकारी बँकेची
रूपे डेबिट कार्ड सेवा सुरू;
अहमदनगर ;

येथील अहमदनगर शहर सहकारी बॅंकेने आधुनिक बँकिंगच्यादृष्टीने दि. १९ जुलै पासून रुपे डेबिट कार्डची सुविधा ग्राहकांना पुरविण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भातील कार्यक्रम लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन डॉ. विजयकुमार भंडारी यांनी दिली.
रुपे कार्ड सुविधा शहर बॅंकेच्या ग्राहकांना उपलब्ध व्हावी म्हणून बॅंकेच्या व्यवस्थापनातर्फे एन.पी.सी.आय.यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानूसार निकषांना पात्र ठरत शहर बॅंकेला ही सुविधा सुरु करण्याची परवानगी मिळाली होती अशी माहिती व्हा. चेअरमन सौ. निलीमा पोतदार यांनी दिली.
शहर सहकारी बॅंकेच्या या रुपे डेबिट कार्डमुळे ग्राहकांना रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता नसून, कार्ड स्वाईप करुन विविध ठिकाणी व्यवहार करता येणार आहे. अत्याधुनिक तंत्रप्रणाली अंगीकृत करण्यामध्ये अहमदनगर शहर सहकारी बॅंक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. या नंतर लवकरच बॅंकेच्यावतीने नेट बँकिंग ही सुविधा देखील लवकरात लवकर देण्याचे प्रय▪संचालक मंडळातर्फे सुरु असल्याचेही सीए. घैसास यांनी सांगितले.









