चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने; अहमदनगर ; चर्मकार समाजाच्या विकासासाठी स्व.बाबू जगजीवन राम यांच्या नावाने स्वत...
चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने;
अहमदनगर ;
![]()
चर्मकार समाजाच्या विकासासाठी स्व.बाबू जगजीवन राम यांच्या नावाने स्वतंत्र केंद्रीय आयोग स्थापन करावे व समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष शिवाजी साळवे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, राज्य सचिव शोभा धस, बाबासाहेब लोहकरे, चंद्रकांत जाधव, दिनेश परदेशी, बाळासाहेब केदारे, रमेश सोनवणो, शोभा कानडे, अजय भवरे, कैलास गांगर्डे, राजू परदेशी, गोरख चव्हाण, विशाल बेलपवार आदि उपस्थित होते.
देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात २0 टक्के चर्मकार समाजाची लोकसंख्या आहे. महाराष्ट्रात मागासवर्गीय लोकसंख्येत ७ टक्के चर्मकार समाजाचे प्रमाण आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरसुध्दा चर्मकार समाज आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकियदृष्ट्या मागासलेला असल्याने, समाजाच्या प्रगतीसाठी स्व. बाबू जगजीवन राम यांच्या नावाने केंद्रीय आयोग स्थापन करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच स्व. बाबू जगजीवन राम यांना भारतर▪द्यावे, संत शिरोमनी रविदास (रोहीदास) महाराजांच्या जयंती निमित्त शासकिय सुट्टी जाहिर करावी. देशातील चर्मकार समाजातील जाती व पोटजातींना रविदासी या नावाने संबोधले जावे. या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले. गुजरातमध्ये दलितांवर झालेल्या हल्लय़ाचा व कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शाळकरी मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा यावेळी जाहिर निषेध करण्यात आला.
|










