Archive Pages Design$type=blogging

मतदार यादीतून आडव्या बाटलीचे चिन्ह हद्दपार दारूबंदीसाठी अण्णा हजारे आंदोलन करणार

मतदार यादीतून आडव्या बाटलीचे चिन्ह हद्दपार दारूबंदीसाठी अण्णा हजारे आंदोलन करणार; शासनाच्या २00८ मधील अध्यादेशानुसार दारुबंदी निवड...


मतदार यादीतून आडव्या बाटलीचे चिन्ह हद्दपार
दारूबंदीसाठी अण्णा हजारे आंदोलन करणार;
शासनाच्या २00८ मधील अध्यादेशानुसार दारुबंदी निवडणुकीच्या मतपत्रिका तयार करणार असून याबाबत अधिक माहिती सांगता येणार नाही.
-भारती सागरे, तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी. निघोज दारुबंदी निवडणुकीसाठी महिलांनी सुमारे १३ वेळा संघर्ष केला आहे. आता मतदानाची वेळ जवळ आली असताना काहीतरी पळवाटा शोधून मतपत्रिकेतून चिन्ह हद्दपार करण्याचा प्रयत्न झाल्यास मतपत्रिकेवर चिन्ह येईपर्यंत मतदानावर बहिष्कार घालणार आहोत.
-बबन कवाद, निघोज दारुबंदी चळवळीचे प्रमुख. निघोज येथील दारुबंदीच्या निवडणूक मतपत्रिकेवर उभी बाटली-आडवी बाटली यांचे चिन्ह नसल्याने अनेक महिलांना त्यांच्या हक्कापासृन वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. चिन्ह घेण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. अन्यथा निघोजकरांनी आंदोलन केल्यास आपण त्यांच्यामागे राहू.
-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक. पारनेर : तालुक्यातील निघोज येथे ३१ जुलै रोजी मतदान होणार असले तरी मतपत्रिकेवरून आडव्या बाटलीचे चिन्हच हद्दपार झाल्याने दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, दारुबंदी निवडणुकीच्या मतपत्रिकेवर चिन्हेच नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली असून यात तत्काळ बदल केला नाहीतर आपण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले, तर निघोजकरांनी या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
निघोज येथे दारुबंदीसाठी रविवारी मतदान होत आहे. या मतदानासाठी महसूल विभागाकडे नियोजन असून शासनाच्या २00८ च्या अध्यादेशाप्रमाणे निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती समजली. दरम्यान, निघोजमधील दारुबंदी कार्यकर्त्यांची दारुबंदीचा प्रचार सुरू करताना आडव्या बाटलीवर शिक्का मारण्याचे आवाहन केले होते. मात्र काही दारू विक्रेत्यांनीच निवडणुकीमध्ये उभी बाटली-आडवी बाटली अशी चिन्हेच नसल्याचे म्हणत दारुबंदी चळवळीच्या आडव्या बाटलीवर आक्षेप घेण्यात आला. दरम्यान, शासनाच्या २00८ चा अध्यादेशात पाहिले असता त्यात दारुबंदी निवडणुकीतील मतपत्रिकेत कोणतेच चिन्ह नसल्याचे दिसून येत असून फक्त मतदानाची तारीख, वेळ व ठिकाण यांच्यासह मद्यविक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी किंवा बंद करावी, असे दोनच पर्याय देण्यात आले आहेत.
यामुळे आता निघोजमधील महिलांची चिन्ह नसल्याने अडचण होणार आहे. यामुळे दारुबंदी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: मतदार यादीतून आडव्या बाटलीचे चिन्ह हद्दपार दारूबंदीसाठी अण्णा हजारे आंदोलन करणार
मतदार यादीतून आडव्या बाटलीचे चिन्ह हद्दपार दारूबंदीसाठी अण्णा हजारे आंदोलन करणार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuXKkcId0fWQJctzeSpMjl2-I9989A1znHlAYUK_7bY9bCL_ouiE-SmIr-iD_GTXS1Tz7Rb1lvEpH1HfFXiMJtrZn97LY2H2m23e8Aq8Hf0-_ZK34xXkHGF1CxQf1jv-M-uFRrkqB0sQrh/s200/Lss+news.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuXKkcId0fWQJctzeSpMjl2-I9989A1znHlAYUK_7bY9bCL_ouiE-SmIr-iD_GTXS1Tz7Rb1lvEpH1HfFXiMJtrZn97LY2H2m23e8Aq8Hf0-_ZK34xXkHGF1CxQf1jv-M-uFRrkqB0sQrh/s72-c/Lss+news.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_760.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_760.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago