भिंगारनाल्याजवळ पेटली चालती मोटार; अहमदनगर: नगर-पाथर्डी रस्त्यावरील भिंगारनाला येथे शुक्रवारी चालत्या मोटारीने पेट घेतला. मो...
भिंगारनाल्याजवळ पेटली चालती मोटार;
अहमदनगर:

नगर-पाथर्डी रस्त्यावरील भिंगारनाला येथे शुक्रवारी चालत्या मोटारीने पेट घेतला. मोटारीसह त्यात असलेल्या कपड्यांचे यात नुकसान झाले. सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज भिंगार कॅंप पोलिसांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी, भिंगारनाला येथील गोगादेव मंदिरासमोरील रस्त्याने जात असलेल्या मोटारीने अचानक पेट घेतला. मोटार पेटण्याच्या अगोदर चांगलीच गरम झाली होती. त्यातच पेट्रोलचा पाइप लिक झाला आणि मोटारीने पेट घेतला, असे पोलिसांनी सांगितले. मोटारीत कपडे होते. आग जास्तच पसरताच कपड्यांनी देखील पेट घेतला. त्यामुळे चालक हा मोटार सोडून पळून गेला. काही स्थानिकांनी ही आग विझविण्याचा प्रय▪केला. पण, त्यांचे प्रय▪अपूर्ण ठरले.
श्रीमती भिंगारकर यांनी याची माहिती तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाली दिली. महापालिकेचे अग्निशमन दलाचे जालिंदर घोडके, रोहिदास साळवे, दत्तू शिंदे आणि संजय लेंडकर यांनी पाण्याचा बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आगीवर पाणी ओतून ती आटोक्यात आणली. आग एवढी फोफावली होती, की मोटार त्यात जळून खाक झाली. भिंगार कॅंप पोलिसांनी याची नोंद केली आहे.









