युवक कॉंग्रेसच्या वतीने कोपर्डी घटनेचा निषेध करून निर्भयास श्रध्दांजली; 'शासनाने महिला व विद्यार्थिनींना संरक्षण द्यावे' अ...
युवक कॉंग्रेसच्या वतीने कोपर्डी घटनेचा निषेध करून निर्भयास श्रध्दांजली;
'शासनाने महिला व विद्यार्थिनींना संरक्षण द्यावे'
अहमदनगर/;

तरुण पिढीला चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी समाजात जागृती करण्याचे काम व्हायला हवे. कोपर्डी येथील घटना निंदणीय आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात ही घटना घडली असतानाही पालकमंत्री पार्टीचे आयोजन करतात, ही खेदजनक बाब आहे. या घटनेचे कोणीही राजकारण करू नये, महिला व विद्यार्थिनींना संरक्षण देण्याचे काम शासनाने करावे, असे आवाहन युवक कॉंग्रेसचे राज्याचे प्रभारी ऋत्विक जाशी यांनी केले. युवक कॉंग्रेसच्या वतीने कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली वाहण्यात आली. या वेळी श्री. जोशी बोलत होते. याप्रसंगी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष हेमंत ओगले, निखिल वारे, बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब मोहारे, सविता मोरे, मंगल भुजबळ, संध्या मेढे, मोहसीन शेख, गौरव ढोणे, मुबिन शेख, शुभम लोणकर, स्वप्निल पवार, अजित वाकडे, दादासाहेब साबळे, स्वप्निल गाडिलकर, हसन शेख आदी उपस्थित होते.
श्री. ओगले म्हणाले की, नगर जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे, अशी घटना येथे घडते हे खेदजनक आहे. मोर्चे, आंदोलने करून चालणार नाही, तर या घटना घडू नये, यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. नगर जिल्ह्यात अशा घटना व्हायला नकोत. नगर जिल्ह्याने देशाचे व राज्याचे नेतृत्व केले आहे. चांगल्या विचारांची जिल्ह्याची ओळख त्यामुळे पुसत चालली आहे. सरकार कोणाचे असो सर्वांनी एकत्र येवून या घटनेचा निषेध केला पाहिजे. दक्षिण लोकसभा मतदारसंघात मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी युवक कॉंग्रेस घेणार आहे, असे ते म्हणाले. या वेळी निखिल वारे, मंगल भुजबळ, सविता मोरे, बाळासाहेब भुजबळ आदींनी विचार मांडले.









