राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणास सुरूवात करंजी ते तिसगाव पहिला टप्पा मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कल्याण - विशाखापट्टपण रा...
![]() |
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणास सुरूवात करंजी ते तिसगाव पहिला टप्पा
मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कल्याण - विशाखापट्टपण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची सुरूवात करंजी पासून झाली असून, पहिल्या टप्प्यात करंजी ते तिसगाव रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण होणार आहे.
कल्याण- विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी सुमारे १२९ कोटीचा निधी मंजूर झाला असून, ५२ किलोमीटर रस्त्याचे काम यामध्ये पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असले. तरी दुसर्या टप्प्याचे काम करंजी घाट ते मेहेकरी पर्यंत केले जाणार आहे. नगर-पाथर्डी रस्त्यावरून कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या रस्त्याचे भाग्य उजळले आहे. त्याच बरोबर रस्त्यालगत येणार्या जमिनींचे भाव गगणाला भिडले आहेत. हळूहळू लहान-मोठे ढाबे, हॉटेल या रस्त्याच्या कडेला सुरू झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाल्याने नगर पाथर्डी मार्गे जाणार्या सर्व लहान-मोठय़ा वाहन चालकांनी कामाच्या ठिकठिकाणी वाहने सावकाश व सावधगिरीनी चालवावी असे आवाहन संबंधित ठेकेदाराने व अधिकार्यांनी केले आहे. अरुंद पूल हटवून नवीन रुंद पूल उभारले जाणार आहेत. धोकादायक वळणे काढली जाणार आहेत.










